जळगाव : जोशी कॉलनी परिसरातील मुकूंद नगरात धनराज सुभाष जोशी यांच्या उघड्या घरातून चोरट्याने १० हजार रुपये रोख, २१ हजाराचे दागिने व मोबाईल असा ३२ हजाराचा ऐवज चोरुन नेल्याची घटना मंगळवारी पहाटे तीन वाजता घडली. पिवळ्या रंगाचा टी शर्ट परिधान केलेला चोरटा घरातून पळतांना जोशी यांना दिसला, मात्र चाहूल लागताच त्याने पलायन केले.धनराज जोशी हे सोमवारी रात्री घर उघडे ठेवून कुटुंबासह झोपले होते. पहाटे तीन वाजता पत्नीला पिवळा शर्ट घातलेला एक जण घरातून पळतांना दिसला. त्यांनी हा प्रकार पतीला सांगितला. तितक्यात चोरटा पसार झाला. सकाळी जोशी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून हकीकत सांगितली. त्यानुसार चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देवेंद्र नगरातही चोरीसंभाजी नगर परिसरातील देवेंद्र नगरातील चेतन गणेश शिरसाठ यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार हजार रुपये लांबविल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात तक्रार देण्यात आलेली आहे. चेतन शिरसाठ हे पत्नी, आई व मुलांसह देवेंद्र नगरात वास्तव्याला आहेत. ते काही दिवसापासून म्हसावद येथे गेले होते. मंगळवारी सकाळी घराचे कुलूप तुटलेले दिसल्याने शेजारी राहणाऱ्यांनी शिरसाठ यांना कळविले. त्यानुसार चेतन शिरसाठ व मामा राजेंद्र पंडीत मोरे यांनी घरी येऊन पाहणी केली असता घरातील सामान अस्ताव्यस्त झालेला होता.
जळगाव येथे उघड्या घरात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 7:31 PM
३२ हजाराचा ऐवज लंपास
ठळक मुद्देदेवेंद्र नगरातही चोरीचोरट्याविरुध्द गुन्हा दाखल