गोपाळ व्यासबोदवड : शहरात चोरीचे त्र सुरूच असून, चोरट्यांनी दोन दुकाने फोडून त्यातून सुमारे ६० हजारांचा ऐवज लांबविला. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली असून, पाचपैकी दोन दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. शुक्रवारी पहाटे या घटना घडल्या.शहरात चोरट्यांनी एकाच रात्रीत चोरीच्या पहिल्या घटनेप्रमाणे दोन दुकाने फोडून प्रभारी पोलीस निरीक्षक याना जणू सलामी दिली आहे. ७ रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास शहरातील गौरीशंकर व्यापारी संकुलातील मयूर मोबाइल शॉपी हे दुकान अंदाजित तीस वर्षे वयोगटातील पाच चोरट्यांनी शटर टॉमीने वाकवून त्यात प्रवेश केला. त्यातील १० रुपयांच्या नोटांचे सात बंडल तसेच एक हजारांची चिल्लर, चार हजारांचे डिजिटल घड्याळ, सात हजारांचे हेडफोन तसेच १५ हजारांचे मोबाइल असे एकूण ५० हजारांपर्यंतचे साहित्य चोरून नेले. तसेच इतर साहित्याची नासधूसही केली. अवघ्या दोन तासात दोन दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य करीत आपला डाव साध्य केला.२२ मिनिटात फरारपाच चोरटे संकुलात रात्री १.४५ ला आले. २.०८ मिनिटांनी दुकानाचे शटर तोडले व अवघ्या २२ मिनिटात दुकानातील साहित्य घेऊन २.३० ला चोरटे पसार झाले.त्यानंतर शहरातील स्टेशन रोडला जय मातादी नगरच्या रस्त्यावर असलेले राजमल खुबचंद अग्रवाल यांचे धान्य दुकान चोरट्यानी रात्री २.४५ ला फोडले. त्यातून गल्ला घेऊन पळून गेले परंतु या गल्ल्यात फक्त दोन हजारांची चिल्लर व दोन हजारांचा मोबाइल व कपाटाची चावी असल्याने पुन्हा चोरटे ३.१५ परत आले व चार वाजेपर्यंत पूर्ण धान्य दुकानात साहित्य तसेच सीसीटीव्हीची कॅमेºयाचो तोडफोड करून निघून गेले.यापूर्वी झालेल्या चोºया१४ जुलैला यापूर्वी शहरात एकाच रात्रीत याच पद्धतीने शिवद्वाराजवळचे नवजीवन प्रोव्हिजन, तर गांधी चौकातील ओम आॅनलाइन सेंटर, गौरीशंकर व्यापारी संकुलातील शांती प्रोव्हिजन हे फोडले होते.१९ जुलैला स्वामी समर्थ केंद्रातील दानपेटीमधून ३५ हजार व बाफना ट्रेडर्स मधून कागदपत्रे२३ जुलैला आशिष बडगुजर यांच्या चहा दुकानातून २० किलो चहापत्ती, मोबाइल व चिल्लर अशी १० हजारांची चोरी२७ जुलै मलकापूर रस्त्यावरील प्रीतम मद्य विक्रीचे दुकान फोडून २५ हजारांची चोरी व साहित्य नासधूस३१ जुलै पुन्हा स्वामी समर्थ केंद्रामधून साहित्य व भांडे७ आॅगस्ट रोजी दोन दुकाने फोडली.प्रभारी पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्याकडे शहरवासीयांच्या नजर लागून आहे. त्यांनी दोन्ही घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली. लवकरच या प्रकरणाच्ाां उलगडा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
बोदवडमध्ये चोरीचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 5:08 PM
चोरीचे त्र सुरूच असून, चोरट्यांनी दोन दुकाने फोडून त्यातून सुमारे ६० हजारांचा ऐवज लांबविला.
ठळक मुद्दे मोबाइल शॉपीसह धान्य दुकानासह घर फोडलेसाठ हजारांची चोरीपाच चोरट्यांनी साधला डावसीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीे तोडफोडपहाटे दोन ते चारच्या दरम्यानची घटना