भुसावळ : शहरातील अत्यंत उच्चभ्रू लोकवस्तीमधील तापीनगरातील हिंदू हौसिंग सोसायटीत चोरटे सक्रीय झाले की काय असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे. तापी नगरात एकाच रात्री दोन-तीन ठिकाणी चोरटय़ांनी धाडसी घरफोडी केली आहे. चोरटय़ांनी दोन दुकाने फोडून चांगलाच डल्ला मारला आहे. घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. चोरीची घटना 23 व 24 जानेवारीच्या सकाळी 7 वाजे दरम्यान घडली. पोलीस निरीक्षक ई.के.पाडळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. शहर पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार तापीनगरातील हिंदू हौसिंग सोसायटीमधील रमेश उद्धवदास आहुजा (वय 58) रा.सिंधी कॉलनी, आर.एस.आदर्श हायस्कूल जवळ यांच्या किराणा दुकानाच्या लाकडी दरवाजाच्या लोखंडी पट्टीवरील कुलूप तोडून चोरटय़ांनी दुकानात प्रवेश केला व दुकानातील काही सुट्टी नाणी, मोबाईल चिचार्ज साहित्याची चोरी केली. याच ठिकाणी असलेल्या पंकज फ्लोअर मिलच्या दरवाजावरील कुलूप तोडून चोरटय़ांनी चोरीचा प्रय} केला मात्र त्यांच्या हाती काहीच लागलेनाही, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.रमेश आहुजा यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी गुरनंन.5/2017 भादंवि कलम 457,380 नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)यावल वन विभागाचे कार्यालय फोडलेयावल शहरातील चोपडा रस्त्यावरील शहरापासून सुमारे तीन कि.मी. अंतरावरील सामाजिक वनिकरण विभाग कार्यालयाच्या वॉल कंपाउंड व कार्यालयाचे कुलूप तोडून चोरटय़ांनी 11 हजार रुपये किमतीची वीज मोटारची वायर, 750 रुपये किमतीचे 25 टिकाव, सहा लोखंडी तगारी, असे 12 हजार 50 रुपयाचे साहित्य चोरून नेले अशी फिर्याद दगडू बु:हाण तडवी या कर्मचा:याने दिल्यावरून भादंवि कलम 457, 380 प्रमाणे नोंद करण्यात आली. शहरातील मदिना नगरातील किफायउल्ला अ. पिंजारी त्यांच्या पुतणीच्या साखरपुडय़ासाठी सहकुटूंब गावी गेले होते. त्यांचे बंद घर चोरटय़ांनी सोमवारी रात्री फोडले. घरातील कपाटात ठेवलेली पाच तोळे वजनाची सोन्याची पोत, सात तोळे चांदिचे दागिने, पाच गॅ्रम सोन्याची अंगठी, एक ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पाच अंगठय़ा असा दोन लाख 15 हजार रूपयांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. पिंजारी यांच्या फिर्यादीवरुन भादंवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याच परिसरात दोन घरे फोडली मात्र त्यांच्या हातात काहीही लागले नाही. चोरीस गेलेला ऐवज असा4रमेश किराणातून चोरटय़ांनी दोन किलो बदाम, फेशवॉश, डीओ, विविध कंपन्यांचे मोबाईल रिचाजर्, पेपर, व्हाऊचर्स, तेलाचे डबे, विविध कंपन्यांचे टूथ-पेस्ट असा एकूण साडेबारा हजार रुपये किंमतीचा माल लंपास केला.
चोरीचे सत्र सुरुच, दोन दुकाने फोडली
By admin | Published: January 25, 2017 12:47 AM