जळगाव: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे मागील अनेक वर्षांचे आॅडीटच झालेले नव्हते, याची कबूली देत वाहन डिलर्स बँकेच्या अधिकाऱ्यांशी हातमिळविणी करीत असल्याची शक्यता असल्याने हे महामंडळ ट्रॅक्टर वाटप महामंडळ होण्याची भितीही मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी सोमवारी दुपारी येथील अल्पबचत भवनातील आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या पुनरूज्जीवनानंतर अध्यक्षपदी निवड झालेल्या नरेंद्र पाटील यांनी जिल्ह्यात महामंडळाच्या योजनांच्या आढाव्यासाठी पहिलीच बैठक सोमवार, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता अल्पबचत भवनात घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला.डिलर्सची बँकांशी हातमिळविणीराज्यभरात फेब्रुवारी ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत तब्बल १८०० ट्रॅक्टरचे वाटप महामंडळाच्या योजनेमार्फत झाले असून जास्त प्रमाणात ट्रॅक्टर वाटप झाल्याने लाभार्थीला व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता घटून तो कर्जबाजारी होण्याची भिती असल्याने मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. तसेच हे प्रकार थांबविण्यासाठी योजनेत काही बदल करण्याचे संकेतही नरेंद्र पाटील यांनी यावेळी दिले. एवढ्या मोठ्या प्रमाणात केवळ वाहनांचीच कर्जप्रकरणे मंजूर होत असून त्या तुलनेत अन्य व्यवसायांची प्रकरणे कमी असल्याबाबत विचारणा केली असता पाटील यांनी सांगितले की, ट्रॅक्टर्सची शेती व्यवसायासाठी मागणी असते. मात्र डिलर्स आमिष दाखवून जास्तीत जास्त ट्रॅक्टर खपविण्याचा प्रयत्न करत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र लाभार्थ्यांनीच याबाबत जागरूक राहून व्यवसाय निवडणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.जिल्ह्यात १० कोटी २६ लाखांचे कर्जवाटपमहामंडळातर्फे जिल्ह्यात तब्बल ४८० कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले असून त्यावर सुमारे १० कोटींचा व्याजाचा परतावाही लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. तर जिल्ह्यात १७८ लाभार्थ्यांना १० कोटी २५ लाख ७७ हजार ३२६ रूपयांचे कर्ज मंजूर केले आहे. तसेच त्यापोटी सुमारे ४१ लाखांचा व्याजाचा परतावाही लाभार्थ्यांना देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.अनेक वर्ष आॅडीटच नाहीया महामंडळाच्या कामाचे आॅडीट झालेले नाही? अशी विचारणा केली असता अध्यक्ष पाटील यांनी सांगितले की, त्यांनी दोन वर्षांपूर्वी पदभार घेतला. त्यापूर्वीचे काही वर्षांचे आॅडीट झालेले नव्हते. मात्र ते आॅडीटही आता करण्यात आले आहे. तसेच महामंडळाचे काम पूर्णपणे आॅनलाईन असल्याने कुणाच्या शिफारसीचाही विषय येत नाही. त्यामुळे भ्रष्टाचारास आळा बसला असल्याचा दावाही त्यांनी केला.महामंडळाच्या योजनेबाबत बँकांना पत्र पाठविणारया आढावा बैठकीत अनेक लाभार्थ्यांनी बँकांकडे गेल्यावर अशी योजना असल्याचे माहितीच नाही. शासन निर्णय आलेला नाही, असे सांगत अधिकारी हात वर करतात, अशी तक्रार केली. त्यावर नरेंद्र पाटील यांनी प्रत्येक बँकेच्या जिल्हा समन्वयकांनी त्यांच्या बँकेच्या सर्व शाखांना महामंडळाच्या योजनांबाबत पत्र पाठवावे. तसेच त्याची प्रत महामंडळाला द्यावी, अशी सूचना जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरूण प्रकाश यांना केली. तसेच महामंडळही सर्व बँकांच्या शाखांना पत्र पाठविण्याचा पुढाकार घेईल, असे आश्वासन दिले.कुणबी व मराठा दोघांना लाभ मिळावायावेळी जिल्हा मराठा महासंघाचे माजी अध्यक्ष सुदाम पाटील तसेच सुनील गरूड व अन्य काही प्रतिनिधींनी मराठा व कुणबी एकच असताना व घरातील अन्य सदस्यांचे कागदोपत्री मराठा व लाभार्थीचे कुणबी असले तरीही त्यास महामंडळाकडून योजनेचा लाभ नाकारला जात असल्याची तक्रार केली. त्यावर नरेंद्र पाटील यांनी राज्यात सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळ नेऊन ही मागणी केली जाईल. मराठ्यांसोबत कुणबींनाही लाभ मिळावा, अशी तरतूद केली जाईल, असे सांगितले.कर्जफेडीची कालमर्यादा वाढविणारसध्या कर्जफेडीची मर्यादा ५ वर्ष असून ती भविष्यात ७ वर्ष केली जाणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तसेच सगळ्याच कर्जदारांना १० लाखांच्या कर्जमर्यादेचा लाभ मिळत नाही. त्यांच्यासाठी टॉपअप योजना सुरू करण्याचे देखील नियोजन असल्याची माहिती पाटील यांनी दिली.मराठा समाजातर्फे सत्कारयावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील नरेंद्र पाटील यांचे स्वागत केले. जिल्हा मराठा महासंघाचे माजी अध्यक्ष सुदाम पाटील, प्रमोद पाटील, सुनील गरूड, शिवम पाटील, अॅड.पी.व्ही.सोनवणे, भगवान शिंदे आदी समाजबांधव यावेळी उपस्थित होते.
...तर अण्णासाहेब पाटील महामंडळ होईल ट्रॅक्टर वाटप महामंडळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:36 PM
अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली भिती
ठळक मुद्दे जिल्ह्यातील कामाचा घेतला आढावा मराठा समाजातर्फे सत्कार