जळगाव : रासायनिक शेती व उद्योग क्षेत्र ही दोन प्रमुख कारणे ग्लोबल वॉर्मिंगची आहेत. हवेतील तापमानाचा स्तर वाढताच राहिला तर आगामी अठरा वर्षानंतर माणसाचं जगणं मुश्किल होईल, असा इशारा डॉ़ सुभाष पाळेकर यांनी दिला आहे.‘चला जाऊ परत निसर्गाकडे’ ही एकदिवसीय विषमुक्त अन्न आणि टेरेस गार्डन कार्यशाळा विवारी घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते़अन्नात व पाण्यात कीटकनाशकांचे प्रमाण वाढल्याने मधुमेह, वंध्यत्व हृदयविकार, कर्करोग असे असाध्य आजार वाढले आहेत़ नैसर्गिक अन्नधान्य, भाजीपाला, फळे उपलब्ध होत नाही. त्यासाठी लोकांनी परसबागेत, गच्चीवर नैसर्गिक भाजीपाला व फळांचे उत्पादन घेणे आवश्यक आहे. गच्चीवर कशाप्रकारे वाफे, नर्सरी माती तयार करावी, भाजीपाला लागवड कशी करावी, जीवामृत, घनजीवामृत व नैसर्गिक कीटकनाशके घरी कसे बनवावे याचे प्रशिक्षण डॉ.पाळेकर यांनी दिले. राज्यभरातून ८०० नागरिकानी कार्यशाळेला उपस्थिती दिली. कार्यशाळेसाठी दीपक सोनार, दीपक पाटील, आशिष पाटील, योगेश लाठी, विश्वेश रावेरकर, तनुजा पाटील, रोहिणी जोशी, रामा माळी, अश्विनी सोनार आदीनी परिश्रम घेतले.सेंद्रीय शेती बॉम्बपेक्षा भयानकसेंद्रिय शेती बॉम्बपेक्षा खतरनाक असून त्यामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन जास्त प्रमाणात होत आहे. हवेचे तापमान आणि उष्णता वाढल्याने खान्देशातही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. हवा शुद्ध करण्यासाठी जंगल आणि झाडे वाढविण्याची गरज आहे. नैसर्गिक शेती काळाची गरज असल्याचे ते म्हणाले़अब तेरा क्या होगा...वातावरण बदलाची प्रचंड घातक प्रक्रिया वेगाने वाढत आहे़ ग्लोबल वार्मींगमुळे एक दिवस संपूर्ण मुंबई, चेन्नई ही शहरे पाण्याखाली जाणार आहेत. तेव्हा मुंबईतील दोन कोटी जनता जळगावात येईल, तेव्हा अब तेरा क्या होगा..़ अशी स्थिती निर्माण होईल, अशा उपहासात्मक भाषेत पाळेकर यांनी वाढत्या प्रदूषणाचे गांभिर्य पटवून दिले़
...तर अठरा वर्षानंतर जगणेच मुश्कील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:36 PM