शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

शहरात 2200 अनधिकृत नळजोडणी

By admin | Published: April 18, 2017 12:24 AM

अमळनेर : नगरपालिकेने शोधमोहीम राबवावी, अनधिकृत नळधारकांना दंड आकारून ते नियमित करण्याची गरज

अमळनेर : शहरात नळधारकांची संख्या प्रचंड असली तरी यातील 2200  नळजोडणी अनधिकृत आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे अनधिकृत नळजोडणीधारक शहरातील करदात्यांच्या हिश्याचे पाणी फुकटात पळवत आहेत. ही बाब नगरपरिषद प्रशासनाला माहीत असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई अद्यापर्पयत करण्यात आलेली नाही. पालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात 21 हजार मालमत्ताधारक आहेत. मात्र नगरपरिषदेची नळजोडणी फक्त 12 हजार 500 मालमत्ताधारकांनी घेतली आहे. उर्वरित मालमत्ताधारक एकतर वैयक्तिक बोअरवेलवरून पाणी घेत असावेत अन्यथा त्यांनी अनधिकृत नळ कनेक्शन घेतले असावे, असा तर्क  आहे.   नगरपरिषदेतर्फे  शहरात करण्यात आलेल्या सव्रेक्षणानुसार केवळ 2200 कनेक्शन अनधिकृत असल्याचे पाणीपुरवठा अभियंता श्यामकुमार करंजे सांगतात. त्यामुळे दरवर्षी 1800 रुपयांप्रमाणे पाणीपट्टी भरणा:या नागरिकांच्या हिश्याचे पाणी पळवणा:या या अनधिकृत नळधारकांची जोडणी  बंद  झाली पाहिजे. अन्यथा त्यांच्याकडून दंड वसूल करून त्यांना नगरपरिषदेने नियमित करून घेतले पाहिजे. ज्यामुळे नियमित कर अदा करणा:या करदात्यांवर अन्याय होणार नाही.नुकतेच नगरपरिषद प्रशासनाने सर्वसामान्य करदात्यांनी भरलेल्या कराच्या रकमेतून 14 लक्ष रुपये भरून हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन घेतले आहे. त्यामुळे शहरवासीयांना मिळणारे पाणी अमूल्य आहे. त्यामुळे  नगरपरिषद प्रशासनाने फुकट पाणी घेणा:यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.अनधिकृत नळजोडणी देण्यात पालिकेतील काहींचा सहभाग असू शकतो. पालिकेचे आर्थिक नुकसान करणा:यांचाही  शोध घेणे गरजेचे आहे. जळोद येथून दररोज एक कोटी लीटर पाणी शहरात पुरवले जाते.  त्यापैकी हजारो लीटर पाण्याची गळती रोज होते. ही गळती सार्वजनिक नळ कनेक्शन आणि, सदोष पाईपलाईनमुळे होत. करदात्यांच्या रकमेतून आणलेले पाणी अशा पद्धतीने वाया जात असताना नगरपरिषद दररोज दर मानसी 100 लीटर पाणी पुरवत असल्याचे दावा  पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात येतो.  आजही शहरात अनेक भागात नगरपरिषदेचे पाणीच पोहोचत नाही. त्यामुळे नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी पाण्याचे योग्य नियोजन केल्यास, पाण्याची गळती आणि अनधिकृत नळजोडणी बंद केल्यास शहराला ऐन उन्हाळ्यात ते एक दिवसाआड पाणीपुरवठा होऊ शकते. यासाठी पालिकेने शोधमोहीम राबविण्याची गरज आहे. जीर्ण पाईपलाईन शोधावीशहरात ज्या भागात जीर्ण पाईपलाईन झाली आहे, तीदेखील बदलण्याची आवश्यकता आहे. कारण या जीर्ण पाईपलाईनमुळेही पाण्याची नासाडी मोठय़ा प्रमाणावर होत असते.               (वार्ताहर)