शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

‘ऑनलाइन’वर फसवणुकीचे प्रकार फार, सरकारने नेमायला हवी ‘मॉनिटरींग बॉडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2022 12:48 PM

ऑनलाइनला टक्कर देत पुढे जाण्यासाठी स्थानिक व्यापाऱ्यांनी काय करावे, त्यांच्यासमोरील अडचणी काय आहेत, ग्राहकांनी कशाला प्राधान्य द्यायला हवे या मुद्यांवर गुरुवारी, सुवर्ण व कापड व्यावसायिकांचे चर्चासत्र ‘लोकमत’ शहर कार्यालयात आयोजित करण्यात आले होते.

जळगाव : ऑनलाइन मार्केटसाठी (इ-कॉमर्स) नियमांची चौकट नाही ही या व्यवस्थेतील त्रुटी आहे. ऑनलाइन खरेदीत फसवणुकीचे असंख्य प्रकार घडत असतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खोटे फॉलोअर्स, खोटे चार्ट बनवले जातात. हे गैरप्रकार थांबविण्यासाठी मॉनिटरींग बॉडी असायला हवी. परंतु तशी व्यवस्थाच नसल्याने स्थानिक दुकानदारांचे अतोनात नुकसान होत आहे, असा सूर व्यावसायिकांनी व्यक्त केला.

ऑनलाइनला टक्कर देत पुढे जाण्यासाठी स्थानिक व्यापाऱ्यांनी काय करावे, त्यांच्यासमोरील अडचणी काय आहेत, ग्राहकांनी कशाला प्राधान्य द्यायला हवे या मुद्यांवर गुरुवारी, सुवर्ण व कापड व्यावसायिकांचे चर्चासत्र ‘लोकमत’ शहर कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. पार्क्सचे सचिंद्र मंडोरे, एस थ्रीचे सुरेश हासवानी, शिवसागर क्रिएशनचे कपिल पैलानी, शीतल कलेक्शनचे अक्षय नाथानी, एस. एम. क्रिएशनचे आकाश मताणी, पातोंडेकर ज्वेलर्सचे किरण पातोंडेकर, नवजीवन क्रिएशनचे अश्विन कांकरिया, दागिना गोल्डचे धनेश वर्मा, हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाचे अभिषेक बाफना, कलर्स एनएक्सचे विनोद चौधरी, भंगाळे गोल्डचे आकाश भंगाळे आदी उपस्थित होते. ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक रवी टाले, महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जाहिरात विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक सुरजकुमार धाये उपस्थित होते.

...म्हणूनच करा स्थानिक खरेदीऑनलाइन खरेदी आणि स्थानिक दुकानात केलेली खरेदी यामध्ये खूप मोठा फरक असतो. कापडाचा दर्जा, फिनिशिंग दोन्हीकडे वेगळे असते. ऑनलाइनवर चित्र एक आणि मिळालेले उत्पादन दुसरेच असते. ऑनलाइनवर मालाची गॅरंटी नसते. ते मालाचे उत्पादक, स्टॉकिस्ट नसतात. स्थानिक दुकानांत फसवणूक होत नाही. काही फॅक्टरी सेल ट्रिकी बिझनेस करणारे असतात. रिजेक्टेड उत्पादने, जुना माल स्वस्तच्या नावाखाली विकला जातो.

...ते चुकीचे सांगतातऑनलाइनचा ज्वेलरी मार्केटवर परिणाम झालेला नाही पण त्यापासून हे क्षेत्र दूर नाही. अनेक ग्राहक ऑनलाइनवर एखादी वस्तू बघतात आणि स्थानिक दुकानात जाऊन अशा वस्तू बनवून मागतात. ग्राहकांना मनासारखे दागिने हवे असतात पण ते तयार करण्यासाठी लागणाऱ्या मशिनवरील खर्च मोठा आहे. यामुळे दुकानदारांचा नफा कमी होत आहे, तरीही तो ग्राहकाला सेवा देतो. सोने, चांदी व हिरे यापैकी कोणतीही वस्तू बनवायला मजुरी लागतेच. त्याशिवाय वस्तू कशा बनतील ? याचा विचार सुज्ञ ग्राहकांनी केला पाहिजे.

फसतात पण बोलू शकत नाहीतऑनलाइन कंपन्या ट्रिकी बिझनेस करतात. फसव्या ऑफर्सला भुलून महाविद्यालयीन मुलेमुली ऑनलाइन खरेदी करतात. बऱ्याचदा फसतात पण घरी सांगत नाहीत. अनेक प्रकरणात जाऊ द्या म्हणून ग्राहकांची दुर्लक्ष करण्याची वृत्ती आढळून येते.

...म्हणून नको ऑनलाइन सोनेजळगाव आणि शुद्ध सोने हे समीकरण पहिल्यापासून आहे. ऑनलाइन कंपन्या विकत असलेले सोने किती शुद्ध आहे हे माहिती नसते, त्यांचे दर स्थानिक व्यापाऱ्यांपेक्षा अधिक असतात याची माहिती ग्राहकांनी घ्यायला हवी.

पायाभूत सुविधा वाढवा, ग्राहकदेखील वाढतीलजळगाव शहरात वाहनांसाठी पार्किंग, चांगले रस्ते यासारख्या किमान मुलभूत सुविधा नाहीत. त्याचा फटका मार्केटला बसत आहे. जळगावला आल्यावर वाहने उभी करण्यासाठी जागा मिळत नाही म्हणून अनेक ग्राहक ऑनलाइनकडे वळतात. या असुविधांमुळे जळगावऐवजी तालुका पातळीवर मोठी दुकाने उभी राहत आहेत. जळगाव शहराचा विकास झाला, तर जळगावचे मार्केट वाढेल.

टॅग्स :fraudधोकेबाजीJalgaonजळगावonlineऑनलाइन