जळगाव : द्रौपदी नगरात पिंटू बंडू इटकरे यांच्याकडे झालेल्या दरोडा प्रकरणात आठवडा उलटल्यावरही कोणतेच धागेदोरे पोलिसांना मिळालेले नाहीत. तांत्रिक माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरच चौकशी केली जात आहे. तपासाचा आढावा घेण्यासाठी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी मंगळवारी रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल बडगुजर यांना पाचारण केले होते, त्याशिवाय इटकरे व त्यांच्या पत्नीला बोलावले होते. त्यांच्याकडूनही काही माहिती घेण्यात आली.
लॅपटॉप चोरणाऱ्याला अटक
जळगाव : जामनेर शहरातील नवकार प्लाझा संकुलातून लॅपटॉप चोरणाऱ्या अक्षय प्रकाश छाडेकर (२३,रा.पाळधी, ता.जामनेर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी जामनेर-नाचणखेडा रस्त्यावरुन अटक केली. जितेंद्र वसंत पाटील यांच्या ई-सेवा केंद्रात ८ फेब्रुवारी रोजी ही चोरी झाली होती. याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल होता.