शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

‘पैसा’ झाला मोठा...हंगाम झाला ‘छोटा’!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 3:18 PM

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात यंदा ‘पैसा’ या किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे.

कुंदन पाटील

जळगाव : यंदाच्या खरिप हंगामात विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात ‘पैसा’ (मिलीपिड्‌स) या किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. ‘पैसा’ खरीप हंगामाच्या जीवावर उठला असताना कृषी संशोधकांनी सुचविलेल्या उपाययोजनांना हाती घेत शेतकरी या किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यात रात्रभरासाठी शिवारातच व्यस्त झाला आहे.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात यंदा ‘पैसा’ या किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. ही निशाचर कीड संपर्कात येणारी रोपटे, बियाणे खाऊन टाकतात. तर रोपांची पाने कुरतूडन दुबार पेरणीची वेळही आणून ठेवतात. सध्या ‘पैसा’ किडीचे प्रमाण वाढल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद उत्पादक हैराण झाले आहेत. ‘पैसा’शी लढण्यासाठी या शेतकऱ्यांना अकोला कृषी विद्यापीठाने उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यानुसार बहुतांश शेतकरी ‘पैसा’च्या नाईनाटासाठी रात्री उशीरापर्यंत शेतशिवारात थांबून असल्याचे दिसून येत आहे.

काय कराल?

‘पैसा’ हा रात्रीच्या वेळी जास्त सक्रीय होतो. त्यामुळे रात्री पालापाचोळा, वाळलेला, कुजलेला काडीकचरा, गवत गोळा करुन नष्ट करावे. सकाळी या ढिगाऱ्याखाली ‘पैसा’ जमा करुन मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात टाकावेत. सायंकाळी पिकांना पाणी दिल्यानंतर ‘पैसा’चा प्रादुर्भाव वाढतो. चांगला पाऊस आणि कडाक्याच्या उन्हामुळे ‘पैसा’ नष्ट होतो, असा निष्कर्ष डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील किटननाशक शास्त्र विभागाने नोंदविला आहे.पेरणीपूर्वी बियाण्याला बिजप्रक्रिया केली असल्यास ‘पैसा’चा प्रादुर्भाव कमी आढळून आला आहे. सततचा पाऊस, सुर्यप्रकाश नव्हता, आद्रर्ता जास्त असल्याने ‘पैसा’ किडीचा चालू हंगामात मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. तातडीने उपाययोजना हाती घेतल्यास ‘पैसा’ किडीमुळे होणारे नुकसान टाळता येईल.-डॉ.शरद जाधव, विशेषज्ञ,ममुराबाद (जळगाव) केंद्र, राहुरी कृषी विद्यापीठ.

टॅग्स :Jalgaonजळगाव