जळगाव : भुसावळ येथील नगरपालिका सार्वजनिक बांधकाम सभापती असा फलक लावलेल्या कारमध्ये पैसे आढळून आल्याने समता नगर व स्टेट बॅँक कॉलनीत गोंधळ उडाला होता. शिवसेना उमेदवार नितीन बरडे यांच्या कार्यकर्त्यांनी ही कार घ्यायला आलेले भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचे भाऊ प्रमोद सावकारे यांच्या कानशिलात लगावली. दरम्यान, पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली आहे. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता.संशयास्पद कारची तपासणीसमता नगर व स्टेट बॅँक कॉलनीचा परिसर हा प्रभाग क्र.१२ मध्ये समाविष्ट आहे. या प्रभागातून शिवसेनेचे नितीन बरडे हे प्रभागात फिरत असताना त्यांना कार्यकर्त्यांनी कृपाळ हनुमान मंदिराजवळ एक पांढऱ्या क्रमांकाची कार (क्र.एम.एच.१९ बी.डी.४१४१) संशयास्पद असल्याची माहिती दिली. त्यावरुन बरडे व सहकारी तेथे दाखल झाले. कारची तपासणी करण्याची मागणी बरडे यांनी पोलिसांना केली. या कारमधून पैसे आले आहेत व ते मतदारांना वाटप केले जात असल्याची चर्चा झाल्यानंतर हजार जणांचा जमाव तेथे जमला होता.कारमधून काढले ५० हजाराचे बंडलपोलिसांसमक्ष बरडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कारची तपासणी करायला सुरुवात केली असता त्यात डिक्कीत भाजपाचा पटका व एक बॅग आढळली. पुढे चालकाच्या सीटजवळून एका कार्यकर्त्याने ५०० रुपयांच्या नोटांचे ५० हजाराचे बंडल काढले व ते पोलिसांना दाखविले. त्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी कारच्या दिशेन दगडफेक करुन काच फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला.प्रमोद सावकारे यांच्या कानशिलात लगावलीपैसे असल्याच्या संशयावरुन बरडे यांच्या कार्यकर्त्यांनी कारला घेराव घातल्याचे समजल्यानंतर आमदार संजय सावकारे यांचे भाऊ प्रमोद सावकारे हे कार चालकाला घेऊन दुचाकीने तेथे आले. कारमध्ये पैसे नाहीत, ही चावी घ्या व तपासणी करा असे सांगून सावकारे यांनी पोलिसांच्या हातात चावी दिली.मात्र कार्यकर्त्यांनी आधीच कारचे दरवाजे उघडले. यावेळी नितीन बरडे यांनी सावकारे यांना खडेबोल सुनावले. त्यात संतापलेल्या कार्यकर्त्यांनी गर्दीची संधी पाहून सावकारे यांच्या कानशिलात लगावली. परिस्थितीचे भान ठेऊन सावकारे तेथून तत्काळ निसटले.ते पैसे पोलिसांकडे का जमा केले नाहीत : सावकारेही कार भुसावळ येथील नगरसेवक अमोल इंगळे यांच्या मालकीची असल्याची माहिती प्रमोद सावकारे यांनी ‘लोकमत’ ला दिली. या कारमध्ये पैसे नव्हतेच. बरडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याजवळचे पैसे कारमध्ये असल्याचे भासविले. कारमध्ये पैसे होते तर ते पोलिसांकडे का जमा केले नाहीत. ती रक्कम स्वत:जवळ का ठेऊन घेतली असा प्रश्न सावकारे यांनी उपस्थित केला. निवडणूक असल्याने आम्ही प्रचारासाठी येणारच असेही ते म्हणाले. नगरसेवक इंगळे व चालक असे जेवणाला बाहेर गेले होते, त्यामुळे ती कार मंदिराजवळ लावलेली होती, असे सावकारे म्हणाले.कारमध्ये बेसबॉलची स्टीकही आढळलीनगरसेवक इंगळे यांच्या कारमध्ये बेसबॉलची स्टीक आढळून आली, ती पोलिसांनी जप्त केली आहे. हाणामारीच्या तयारीनेच भुसावळचे कार्यकर्ते आले होते असा आरोप बरडे समर्थकांनी केला. दरम्यान, पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम यांनी घटनास्थळी गाठून भरारी पथकाला घटनास्थळी पाचारण केले, त्यानंतर कार ताब्यात घेतली.
भुसावळ पालिका सभापतीच्या कारमध्ये पैसे आढळल्याने जळगावात प्रचंड गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 1:30 PM
मतदारांना पैसे वाटपाचा संशय
ठळक मुद्देआमदार संजय सावकारे यांच्या भावाच्या कानशिलात लगावलीसंशयास्पद कारची तपासणी