ऑनलाईन लोकमत रावेर (जि. जळगाव), दि.29 : पर्यावरणपूरक शाडू मातीशिवाय मूर्तीकला जिवंत राहूच शकत नाही, असे मत ब:हाणपूर येथील मूर्तिकार राजेश मोरे यांनी व्यक्त केले. मुंबईत एका मूर्तिकाराकडे रोजगार प्राप्त झाल्याने मूर्तीकलेशी ते समरस झाले. मूर्तीकलेतील प्रात्यक्षिक ज्ञान पूर्णपणे अवगत करून ब:हाणपूर शहरात परतले. शाडूमातीच्या मूर्ती बनविण्याचा व्यवसाय वृद्धिंगत केला. एक ते 25 फुटांपयर्ंत उंची गाठणा:या विविध भावमुद्रेतील काळानुरूप लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई गणपती, मरतड रूपी, बाहुबली रूपी, दत्तावतारातील, साईअवतारातील, रथाचे सारथ्य करणारी, शिवशंकर पार्वती परिवारातील रूपकं असलेल्या गणरायाच्या मूर्त्ीनी गणेशभक्तांच्या मनात घर करून खान्देशात चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर, यावल, बोदवड, चोपडा तालुक्यांसह विदर्भात मलकापूर, बुलडाणा, जालना, मध्य प्रदेशातील खंडवा, खरगोन इंदूर, उज्जैन भागात नव्हे तर दिल्लीर्पयत मजल मारली आहे. स्वत: मातीच्या मूर्ती तयार करून त्यांचा साचा स्वत:च तयार करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांच्या मूर्त्ीनी आपले स्थान निर्माण केले. यासाठी त्यांच्यासोबत ज्येष्ठ मूर्तीकामगार भागवत खर्चे यांची साथ लाभली आहे.
मूर्तिकार म्हणतात.. शाडू मातीशिवाय पर्याय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 10:01 PM
ब:हाणपूर येथील मूर्तिकार राजेश मोरे यांनी दिलेली माहिती
ठळक मुद्देदोन पिढय़ांपासून अमरावती येथून ब:हाणपूर शहरात आजोळी स्थलांतरित वडिलांचा मूर्तीकलेचा जोपासला वारसा मध्य प्रदेशातील निमाडसह खान्देशातील भक्तांच्या मनात निर्माण केले घर