जळगाव : शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी गेल्या दोन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पहाटेच्या सुमारास हलक्या पावसानेही हजेरी लावली आहे. जोरात पाऊस आल्यास काढणीवर असलेल्या धान्याच्या नुकसानीची भिती आहे. मात्र ढगाळ वातावरणाचा पिकांवर परिणाम होणार नसल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी गहू, हरभरा काढणीचे काम शेतकºयांनी पूर्ण केले आहे. तर काही ठिकाणी सुरू आहे. बाजरी, ज्वारीही काढण्यात आली आहे.मक्याची काढणी मात्र बाकी आहे. त्यातच गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होऊन पहाटेच्यावेळी हलक्या पावसाने हजेरी लावल्याचे प्रकार होत आहेत. याबाबत कृषी विभागाच्या अधिकाºयांना विचारणा केली असता रेकॉर्डवर घेण्याइतकाही पाऊस झालेला नाही.त्यामुळे त्याचा पिकांवर परिणाम होणार नाही. तसेच बहुतांश पिक काढले गेले आहे. किंवा काढणी सुरू आहे.त्यामुळे ढगाळ हवामानाचा त्यावर परिणाम होण्याची भिती नाही. फक्त जोरदार पाऊस आल्यास मात्र या काढणी सुरू असलेल्या पिकावर डाग पडण्याची व ते पिक खराब होण्याची भिती असल्याचे त्यांनी सांगितले.
ढगाळ हवामानाचा पिकांवर परिणाम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 5:55 PM
कृषी विभागाची माहिती
ठळक मुद्देकाढणीवर असलेल्या धान्याच्या नुकसानीची भिती काही ठिकाणी सुरू आहे हरभरा काढणीचे काम मक्याची काढणी मात्र बाकी