शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

भुसावळच्या ट्रामा सेंटरमध्ये नॉन कोविड सेवा नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 2:37 PM

सीएस यांच्या आदेशाला केराची टोपली

भुसावळ : शहरातील ट्रामा सेंटरला नॉन कोविड रुग्ण सेवेच्या सुविधा मिळाव्या यासाठी भारतीय जनता पार्टी वैद्यकिय आघाडीचे संयोजक डॉ. नी. तू. पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार जिल्हा शल्य चिकित्सक  (सीएस) डॉ. नागोजी चव्हाण यांनी ११ नोव्हेंबर रोजी ट्रामा सेंटरला नॉन कोविड सेवा देण्याचे आदेश दिले होते. मात्र तब्बल १० दिवस उलटूनही आदेशाचे पालन न झाल्याने स्थानिक प्रशासनाबद्दल संताप व्यक्त होत आहे.भुसावळ ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या कोरोना संक्रमित रुग्ण आहेत तर ट्रामा सेंटरच्या इमारतीमध्ये केवळ आरटीपीसीआर चाचणी घेतल्या जातात. केवळ या चाचणीसाठी ट्रामा सेंटरची इमारत अडकवून ठेवण्यात आली होती. याबाबत डॉ. नी. तू. पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार  जिल्हा शल्य चिकित्सकांनी ११ नोव्हेंबर रोजी आदेश देत ट्रामा सेंटर हे नॉन कोविड रुग्णांसाठी वापरण्याचे निर्देश दिले होते. मात्र स्थानिक मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. देवर्षी घोषाल यांनी याबाबत आदेश पाळले नाहीत. ११ दिवस उलटूनही ट्रामा सेंटरमध्ये नॉन कोविड सुविधा सुरु झालेली नाही. अद्यापही या ठिकाणी केवळ स्वॅब घेतले जात आहेत. या कामासाठी संपूर्ण इमारत अडकवून ठेवली जात आहे. याबाबत शनिवारी डॉ. नी. तू. पाटील यांनी पाहणी  केली. यासंदर्भात त्यांनी डॉ. चव्हाण यांच्याशी संपर्क साधून आदेशाची अंमलबजावणी का होत नाही? याबाबत तत्काळ कार्यवाही करुन रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.पोलिसांनी मिळेल दिलासा सध्या शहरातील पोलिसांना आरोपी, करागृहातील कैदी यांना वैद्यकिय तपासणीसाठी जळगाव येथील शिरसोली रोड वरील रुग्णालयात घेवून जावे लागते. यामुळे पोलिस यंत्रणेचा वेळ वाया जातो. ट्रामा केअर सेंटरमध्ये इतर रुग्णासाठी उपचाराची सोय तसेच आरोपींची तपासणी सुरु झाल्यास पोलिसांना दिलासा मिळेल.