वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनळे देशभर अडकून पडलेल्या लोकांसाठी १२ मेपासून हळूहळू रेल्वे प्रशासनातर्फे प्रवासी गाड्या सोडण्यात येत आहे. सोडण्यात येणाऱ्या ३० रेल्वे, १५ शहरे जोडणारा असून, मात्र भुसावळ विभागातून यातील एकही गाडी धावणार नाही.१२ मेपासून रेल्वे प्रशासनातर्फे राजधानी दिल्ली येथून ३० गाड्या सोडण्यात येत आहेत. मुंबईकडे जाणाºया गाड्या भुसावळ विभागातून जाण्याची शक्यता होती. मात्र या गाड्या भुसावळ विभागातून न धावता पश्चिम रेल्वेकडून मुंबईकडे जाणार आहे. सोडण्यात येणाºया गाड्यांचे आॅनलाइन टिकिट बुकिंग आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून होत आहे. रेल्वे स्थानकावरील सर्व बुकिंग काऊंटर सध्यातरी बंदच राहणार आहेत. या रेल्वे पॅन्ट्री असणार नाही. पॅक भोजन मिळणार आहे. दिल्लीहून बंगळुरू, भुवनेश्वर, सिकंदराबाद, आगरतळा, हावडा, पटना, अहमदाबाद, मुंबई सेंट्रल याठिकाणी यासह अन्य शहरांमध्ये गाड्या सोडण्यात येणार आहेत.मात्र भुसावळ विभागातून सध्यातरी एकही गाडी जाणार नसल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
भुसावळ रेल्वे विभागातून एकही प्रवासी गाडी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 6:53 PM