मुक्ताईनगर, जि.जळगाव : कापूस उत्पादक तालुका म्हणून नावारूपास आलेल्या व कापसाची बाजारपेठ असलेल्या तालुक्यात दरवर्षी मे महिन्यात पूर्वहंगामी व बागायती कापूस पेरणीची आघाडी असते. सरासरी दीड हजार हेक्टर कापसाची पूर्वहंगामी लागवड येथे केलली जाते. यंदा मात्र पाण्याची बिकट परिस्थिती असल्याने गुंठा किंवा एकरभरही पूर्वहंगामी कापसाची लागवड झाली नाही. तालुक्याच्या इतिहासात असे प्रथमच घडले आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन घटण्याचे फटके सहन करणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा घटते जलस्तर आणि मान्सून लांबणीवर जाण्याचे संकेत पाहता मे महिन्यातील पूर्वहंगामी बागायती कापूस लागवडीबाबत पाठ फिरवली आहे.शासन दरबारी तालुक्यातील पावसाची सरासरी ६५० मि.मी. इतकी आहे. गेल्या तीन वर्षापासून पावसाने आखडता हात घेतल्याने सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी होत आहे. गेल्या वर्षी फक्त ३५७ मि.मी. इतकाच पाऊस झाला आहे. तापी-पूर्णा नदीचे सानिध्य असलेल्या तालुक्यात दोन्ही नद्यांना कमी अधिक प्रमाणात बारमाही जलाशय कायम असते. यंदा मात्र दोन्ही नद्यांमध्ये पाण्याची परिस्थिती बेताची आहे. तापी पात्रात अनेक ठिकाणी तोडे पडले आहेत तर नुकतेच हतनूर धरणातून आवर्तन सोडले गेल्याने पूर्णा पात्रात पाणी तळाशी आले आहे.पाण्याची विदारकस्थितीकेळी उत्पादक पट्टा उचंदे, अंतुर्ली परिसरात पूर्व हंगामी बागायती कापसाची लागवड प्राधान्याने केली जाते, परंतु यंदा पाण्याची विदारक परिस्थिती पाहता त्यांनीदेखील पूर्वहंगामी कापसाची लागवड केलेली नाही. दुसरीकडे पूर्वहंगामी कापसाची लागवड केल्याने गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भावाबाबत धोका अधिक असतो. गेल्या तीन वर्षात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव पूर्वहंगामी कापसाची लागवडीवरच दिसून आला होता. त्यामुळे लागवड करू नये असा सल्ला सातत्याने कृषी विभागामार्फत दिला जात होता. याचादेखील परिणाम तालुक्यातील पूर्वहंगामी बागायती कापूस लागवडीवर झाला आहे.घटते जलस्तर मोठी चिंतेची बाबतालुक्यातील जमिनीतील जलस्तर यावेळी कमालीचे घटले आहे. विहरितील पाणी पूर्णपणे आटले आहे. बागायती केळी उत्पादक शेतकºयांना केळी वाचविण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. दरम्यान, घटते जलस्तर आणि मान्सून लांबणीवर जाण्याचे संकेत पाहता शेतकºयांनी बागायती कापूस लागवडीचा धोका वाटत असल्यानेच शेतकºयांनी पूर्वहंगामी कापसाची लागवड टाळली असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
मुक्ताईनगरात पूर्वहंगामी कापसाची लागवडच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 4:30 PM
कापूस उत्पादक तालुका म्हणून नावारूपास आलेल्या व कापसाची बाजारपेठ असलेल्या तालुक्यात दरवर्षी मे महिन्यात पूर्वहंगामी व बागायती कापूस पेरणीची आघाडी असते. सरासरी दीड हजार हेक्टर कापसाची पूर्वहंगामी लागवड येथे केलली जाते. यंदा मात्र पाण्याची बिकट परिस्थिती असल्याने गुंठा किंवा एकरभरही पूर्वहंगामी कापसाची लागवड झाली नाही. तालुक्याच्या इतिहासात असे प्रथमच घडले आहे.
ठळक मुद्देअन्यथा दरवर्षी होते दीड हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवडघटते जलस्तर मोठी चिंतेची बाब