आॅनलाईन लोकमतजामनेर,दि.१६ : जिल्हा तलाठी संघाने विविध प्रकारचे ३६ दाखल्याचे वितरण बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. महसूल प्रशासनाकडून या प्रकरणी कोणताही निर्णय न झाल्याने सोमवारी विद्यार्थी व नागरिकांनी जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत व्यथा मांडली.काही दिवसांपासून तलाठी बांधवांनी विविध प्रकारचे ३६ दाखले देणे बंद केले आहे. याबाबत जिल्हा तलाठी संघातर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. तलाठी बांधवांकडून दाखले मिळत नसल्याने विद्यार्थी व नागरिकांनी सेतु सुविधा केंद्राकडे धाव घेत आहेत. मात्र या ठिकाणी देखील दाखले मिळत नसल्याने अडचण होत आहे. तलाठी कार्यालयाबाहेर जे दाखले तलाठी यांना देण्याचे अधिकार नाही त्याची यादी लावण्यात आली आहे.शिष्यवृत्ती, संगांयोच्या लाभाची अडचणतलाठी बांधवांकडून दाखले मिळत नसल्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत. तसेच संजय गांधी निराधार योजना तसेच वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे मिळत नसल्याने नागरिकांची अडचण होत आहे.जलसंपदामंत्र्यांकडे मांडली व्यथाविविध प्रकारचे दाखले मिळत नसल्याने होणारी अडचण लक्षात घेता सोमवारी विद्यार्थी व नागरिकांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत आपली व्यथा मांडली. शासन व जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी तोडगा काढावा अशी विनंती देखील केली.या दाखल्यांमुळे होतेय अडचणतलाठी बांधवांनी सध्या वारसा प्रमाणपत्र, वंशावळ पंचनामा, रक्तनातेसंबधाचा दाखला, भूमीहिन शेतमजुर असल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवास प्रमाणपत्र, एकत्र कुटुंब प्रमाणपत्र, विभक्त कुटुंब प्रमाणपत्र, विहिर असल्याचा व नसल्याचा दाखला, ५०० फुटात विहिर नसल्याचा दाखला, विहिर व ट्युबवेल असल्याचा दाखला, निराधार असल्याचा दाखला, भिकारी किंवा याचक नसल्याचा दाखला, धर्मदाय संस्थेकडून मदत नसल्याचा दाखला, विधवा असल्याचा दाखला, पुनर्विवाह न केल्याचा दाखला, मयत कुटुंबप्रमुख असल्याचा दाखला, शासकीय नोकरीस असल्याचा व नसल्याचा दाखला, मयत व्यक्ती कमावती असल्याचा दाखला, चल,अचल संपत्तीचा दाखला, ओलीताचे व बागायतीचे प्रमाणपत्र, जमिनीचा पंचनामा, शेतजमिनीचा नकाशा, चतु:सिमा दाखला, दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्याचा दाखला, विद्युत पंप असल्याचा दाखला, अस्वच्छतेचा व्यवसाय करीत असल्याचा दाखला, वर्तणुकीचा दाखला, अपत्य असले व नसल्याबाबतचा दाखला यांचा समावेश आहे.
दाखल्यासाठी तलाठ्यांचा असहकार, नागरिकांचे मात्र हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 5:56 PM
दाखले मिळत नसल्याने त्रस्त विद्यार्थी व नागरिकांनी घेतली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट
ठळक मुद्देजलसंपदामंत्र्यांकडे मांडली व्यथाशिष्यवृत्ती, संगांयोच्या लाभासाठी अडचणकार्यालयाबाहेर लावली तलाठी बांधवांनी यादी