जामनेर, जि. जळगाव : शाळेच्या पहिल्यात दिवशी शाळेत शिक्षक नसल्याने माघारी परतण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली. जामनेर तालुक्यातील ढालगाव येथील उर्दू शाळेत घडलेल्या या प्रकारानंतर मंगळवारी विद्यार्थी जामनेर पंचायत समितीमध्ये पोहचले व त्यांनी तेथेच शाळा भरविली.जामनेर तालुक्यातील ढालगाव येथील उर्दू शाळेतील शिक्षकांच्या आॅनलाईन बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर पर्यायी शिक्षक हजर झाले नाही. परिणामी १७ जूनला पहिल्या दिवशी शाळा उघडलीच नाही. त्यामुळे विद्यार्थी घरी परतले. या प्रकारामुळे संतप्त पालकांनी विद्यार्थ्यांसह मंगळवार, १८ जून रोजी सकाळी जामनेरला येऊन पंचायत समिती कार्यालयात आवारातच शाळा भरविली. विद्यार्थी दप्तरासह जमिनीवर बसल्याने रस्त्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्यांची गर्दी झाली. गटशिक्षणाधिकारी आदिनाथ वाडकर यांनी तेथे भेट दिली.
जामनेर तालुक्यातील ढालगाव येथे शिक्षक नसल्याने शाळा भरली पंचायत समिती परिसरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:49 PM