महिंदळे, ता. भडगाव : पावसाळा सुरू होऊन दिड महिना झाला तरीही परिसरात अजूनही पावसाची हुलकावणीच आहे.यामुळे विहिरींनी अजूनही तळ गाठला असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.महिंदळे परिसरातील शेतक-यांनी विहीरींच्या तोडक्या पाण्यावर ठिबक सिंचनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कपाशी लागवड केली होती मात्र विहीरींचे पाणी आटल्यामुळे टॅकरने विहिरीत पाणी टाकले व कपाशी पिक जगवले. परंतु शेवटी पाऊस नसल्यामुळे तेही पीक वाया जाण्याची चिन्हे दिसत आहेत. उन्हाळी कपाशीची वाढ खुंटली आहे.मृग नक्षत्रात परिसरात पावसाचे आगमन यावर्षी झालेच नाही, त्यामुळे शेतक-यांना पेरण्या आर्द्रा नक्षत्रात कराव्या लागल्या... त्याही तोडक्या पावसाच्या बळावर. पेरण्या शंभर टक्के पूर्ण झाल्या व उगवनही चांगली झाली.परंतू जोरदार पाऊस नसल्यामुळे जमिनीत ओलावाच नाही. गेल्या आठ दिवसापासून तर तुरळक सरीही परिसरात नाहीत. त्यामुळे पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. विहीरींनी पुर्ण तळ गाठला आहे.उन्हाळी कपाशी पाण्याअभावी माना टाकायला लागली आहे. विहीरींमध्ये त्यांना द्यायला पाण्याचा थेंब नाही.त्यामुळे त्यांची वाढ खुंटली आहे. कोरडवाहू पिकेही मोठ्या जोमाने जमिनितून वर आली आहेत पण त्यांनाही आता पाण्याची अवश्यकता आहे . ती पिकेही पाण्याअभावी निपचित पडली आहे. आता मात्र पाऊस आला नाही तर शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट समोर उभे दिसायला लागले आहे.चाऱ्याचे भाव गेले गगनालापावसाळा लागून दिड महिना संपत आला. परंतु परिसरात अजून जोरदार पाऊस नसल्यामुळे जमिनीत चारा उगवला नाही. शेतकऱ्यांचा नियोजित चारा आता संपत आला आहे. पाऊस लांबल्यामुळे चारा विकत घेण्याची वेळ आली आहे. परंतू चाºयाचे भाव गगनाला पोहचले आहेत.त्यामुळे परिसरातील पशूधन संकटात आले आहे. कवडीमोल भावातही पशूधन कुणी घ्यायला तयार नाही. यामुळे शेतकºयांना आता आकाशाकडे चातकाप्रमाने पाण्याची वाट पाहत बसण्याची वेळ आली आहे.
अजूनही विहिरींना पाणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 5:36 PM