जळगाव जिल्हा बँकेच्या नशिराबाद शाखेत पुरेशी रक्कम मिळेना !
By admin | Published: July 16, 2017 12:02 PM
शेतकरी नोकरदारवर्ग यांच्यासह अन्य हजारो ग्राहकांची खाते आहेत.
ऑनलाईन लोकमतनशिराबाद, जळगाव, दि. 16 - : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नशिराबाद शाखेत खातेदारांना पुरेशी रक्कम मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहे. नशिराबाद येथे मुख्य मार्गावर बँकेची शाखा आहे. शेतकरी नोकरदारवर्ग यांच्यासह अन्य हजारो ग्राहकांची खाते आहेत. वीज बिल भरणा एकमेव केंद्रदेखील आहे. बँकेत खातेदारांना मागणीपेक्षा 20 ते 25 हजाराचाच विड्रॉल भरण्याची सक्ती केली जात आहे. बँकेत रक्कम शिल्लक नाही. त्यामुळे एवढीच रक्कम दररोज काढा असे सांगण्यात येते. याबाबत बँकेकडून सूचना फलकावर कुठलीही सूचना नाही. तसेच बॅँकेकडे नोटा मोजण्याचे मशीन नसल्यानेदेखील नोटा मोजण्यासाठीही बॅँक कर्मचा:यांचा वेळ जात असतो. बँकेत सुमारे 30 हजारार्पयतची रक्कम देत आहोत. एकाच वेळी मोठी रक्कम देणे अशक्य आहे. उपलब्ध रक्कम वितरित केली जाते. सहसा कुणासही नाराज केलेले नाही. सर्वानी सहकार्याची भूमिका ठेवावी, असे आवाहन शाखा व्यवस्थापक उद्धव पाटील यांनी केले.