गोपाल व्यास, बोदवड
बोदवड तालुका पूर्वीपासूनच अवर्षणग्रस्त आहे. यासाठी जितके केले तितके कमी म्हणावे लागेल, अशी स्थती तालुक्याची आहे, गेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत बोदवड शहरा सह तालुक्यात पाणी प्रश्न फार गाजला होता. पण चार वर्षे उलटूनही शहराची पाणी समस्या कायम आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही पाण्याने चित्र ही पालटवले नाही. तालुक्यात आज ही पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. आता तालुक्यात २९ ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा कार्यक्रम लागणार असून यात मोठ्या ग्रामपंचायत शेलवड, जामठी,एणगावचा समावेश आहे तर पाणी समस्या अजूनही सुटली नसल्याने ह्या निवडणूक ही पाण्यावर गाजतील अशी स्थती आहे, हेवेदाव्यांचे राजकारण जोरात तालुक्यात आमदारांनी शिरसाळा मारोती मंदिर लॉकडाऊनमध्ये उघडले, तर खासदारांनी कापूस खरेदी मुहूर्ताला आमदारांना टाळले. यात दोन्ही गटातून शाब्दिक हेवादावा आला तर एकनाथ खडसे यांनी आता हातावर घड्याळ बांधल्याने नगरपंचायतमध्ये विरोधात असलेल्या राष्ट्रवादी चे काटे जोरात फिरले व नगरपंचायतमधील विरोध मावळला आहे. आपापसात शहरातील गटारी,रस्ते वाटून घेतले व तब्बल सात कोटींच्या रस्ते गटारींच्या कामाना सुरवात झाली आहे. मात्र महिना उलटत नाही तोच या रस्त्यांवर खड्डे पडायला तर गटारी पडायला सुरवात झाली आहे, पण आता विरोध करणार कोण असा प्रश्न पडला आहे,तर राजकारणातील हेवेदावे किमान आता तालुक्याचा विकासासाठी व्हावे हीच अपेक्षा आहे, कापूस उद्योगाला लॉकडाऊनची भीती शहरात प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी नसताना चिल्ड वाटर प्लॉंट, साबण उद्योग, व शहरातील बोगस गटारी यावर नगरपंचायतीची कृपा आहे तर अवैध धंदे, चोरीवर पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहेत. अवैध वाळू वाहतुकीने तर शहरातील रस्त्यांची जणू वाट लागली आहे. औरंगाबाद -इंदूर हा राष्ट्रीय महामार्ग शहरातून जात आहे. त्यासाठी अतिक्रमणधारकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तालुक्यात राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार व राष्ट्रवादीमध्ये आलेल्या नेत्याकडून विकासाची आस नागरिकांना आहे तर दोन्ही गट मुक्ताईचा आशीर्वाद लाभावा हीच अपेक्षा व्यक्त करीत आहेत.