जिल्ह्याचे नाव : जळगाव
जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय रुग्णालय १
महापालिकेची तपासणी केंद्र ६
किती रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले आहे?
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे २०१९मध्ये फायर ऑडिट झालेले आहे. महापालिकेच्या रुग्णालयात केवळ रुग्णांची तपासणी होत असल्याने ऑडिट झालेले नाही.
किती रुग्णालयात इलेक्ट्रिक ऑडिट झालेले आहे?
एकाही रुग्णालयात इलेक्ट्रिक ऑडिट झालेले नाही.
-सुरक्षा व्यवस्थेची स्थिती काय?
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुरेशी मोकळी जागा असून, घटना घडल्यास आपत्कालिन व्यवस्था म्हणून आग विझविणारे सिलिंडर प्रत्येक कक्षासमोर लावण्यात आले आहेत. मात्र, यातील सहा सिलिंडर हे मुदतबाह्य आहेत. सुरक्षारक्षक नेहमी तैनात असतात. जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
रुग्णांमागे डॉक्टर परिचारिकांची संख्या
- दररोज या रुग्णालयात साडेचारशे रुग्ण तपासणीला येत आहेत. येथे डॉक्टरांची संख्या १४१ परिचारिका असून १६४ डॉक्टर्स आहेत. यात प्रत्येक चार रुग्णांमागे साधारण १ डॉक्टर अशी परिस्थिती आहे.