शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

कोविड रुग्णालयातून १३७ रुग्ण झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 12:30 PM

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून आठवडाभरात १३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे़ ही एक मोठी दिलासादायक ...

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून आठवडाभरात १३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे़ ही एक मोठी दिलासादायक बाब असून गंभीरावस्थेतील हे रुग्ण बरे झाल्याचे चित्र आहे़ दरम्यान, सोमवारी शहरात ५६ नवे रुग्ण आढळल्याची नोंद असून २४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे़ज्या रुग्णांना मध्यम लक्षणे असतात किंवा ज्यांची प्रकृती अत्यवस्थ असते, अशा रु्णंना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात येत असते़ अशा रुग्णांचेही बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून कोविड रुग्णालयातील हे प्रमाण समाधानकारक असल्याच चित्र समोर येत आहे़ सरासरी १९ रुग्ण रोज बरे होऊन घरी जात असल्याचे या आठवडाभराच्या आकडेवारीवरून समोर येत आहे़ कोविड रुग्णालयाची प्रतिमा दिवसेंदिवस बदलत असल्याचे चित्र आहे़शहराची रुग्णसंख्या १४७६शहरातील अयोध्यानगरसह अनेक भागांमध्ये पुन्हा रुग्ण आढळून आले आहेत़ त्यात विसनजीनगर, धनाजीनाना नगर या नवीन भागातही रुग्ण आढळून आले आहेत़ शहराची रुग्णसंख्या १४७६ झाली असून त्यापैकी ८०१ रुग्ण बरे झालेले आहेत़गणपती रुग्णालयात येत्या दोन दिवसात ‘सिव्हील’नॉन कोविड रुग्णांची उपचारांसाठी होणारी कसरत व त्यांचे होणारे हाल थांबविणे मोठे आव्हान प्रशासनासमोर असून आता गणपती रुग्णालय येत्या एक -दोन दिवसात नॉन कोविड रुग्णांसाठी सेवेत असेल. या रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांनी दिली़ जिल्ह्यात कोविडचे रुग्ण वाढले त्या रुग्णांच्या व्यवस्थेत नॉन कोविड रुग्णांकडे प्रचंड दुर्लक्ष झाल्याचा प्रकार वारंवार समोर आला आहे़ अनेकांचे उपचाराअभावी जीव गेल्याचेही आरोप झाले आहेत़ अशा स्थितीत शहरात जिल्हा रुग्णालयच नसणे ही गंभीर बाब असून यावर लोकप्रतिनिधींकडूनही वारंवार मागणी व आरोप झाले आहेत़ मात्र, तरीही ही यंत्रणा सुरळीत होत नसल्याचे चित्र आहे़ अखेर गणपती रुग्णालयातून कोविडचे रुग्ण हलवून आता या ठिकाणी नॉन कोविड रुग्णांसाठी अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे़आयुर्वेदीक महाविद्यलयाही असेल सेवेतगुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात असलेले आयुर्वेदीक महाविद्यालयात शंभर बेड हे सिव्हीलसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ या ठिकाणचे काही किरकोळ कामे झाल्यानंतर हे रुग्णालयही नॉन कोविडसाठी दोन ते तीन दिवसात सेवेत येईल, अशी माहिती आहे़सोमवारी या भागात आढळले रुग्णनशेमन कॉलनी २, धनाजी नाना नगर १, गायत्री नगर १, विसनजीनगर १, सुप्रिल कॉलनी १, वाघनगर ४, सालारनगर १, पिंप्राळा हुडको ४, खंडेराव नगर २, भास्कर मार्केट १, अयोध्यानर ३, सिंधी कॉलनी ३, शनिपेठ१, इंद्रप्रस्थनगर १, मेहरूण १, जुनेजळगाव १, शिवाजी नगर १, गणेश कॉलनी १, पिंप्राळा ३, दादावाडी २, एमआयडीसी १, भगीरथ कॉलनी ४, रामेश्वर कॉलनी ५, वाल्मिकनर १, एम़ जे़ कॉलेज परिसर ३, शनिपेठ १औषधी सुरू करण्याबाबत टास्कफोर्सची विनंतीजळगाव : रिटोनाविर व लोपीनावीर ही दोन औषधे स्वस्त तसेच मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. सौम्य लक्षणे असलेल्यांच्या उपचारामध्ये ती वापरण्यात यावी, अशी मागणी टास्कफोर्सतर्फे करण्यात आली असून याविषयी सदस्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन पत्रही दिले़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव