अमळनेर : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वीरित्या व मुदतीत राबवण्यासाठी व्यापारी संघटनेतर्फे अमळनेर नगरपालिकेला ५० आॅक्सिमीटर व ५० थर्मल गन मोफत देण्यात आले.कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी शहरातील ५० वर्षांवरील नागरिकांची तपासणी करून त्यांना तातडीने उपचार करता यावेत म्हणून ५० पथकांमार्फत नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीस विलंब होऊ नये म्हणून व्यापारी संघटना मदतीला पुढे आली आहे. व्यापाºयांनी पालिकेला आॅक्सिमीटर व थर्मल गन दिले आहेत.प्रांताधिकारी सीमा अहिरे व मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले. यावेळी पूनम कोचर, महेश कोठावदे, बिपीन कोठारी, मिलिंद डेरे, राजू वर्मा, मनीष जोशी, संजय चौधरी, आबा चौधरी उपस्थित होते.
अमळनेरात व्यापाऱ्यांकडून पालिकेला थर्मल गन व आॅक्सिमीटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 6:04 PM
व्यापाºयांनी पालिकेला आॅक्सिमीटर व थर्मल गन दिले आहेत.
ठळक मुद्देकोरोना नियंत्रणासाठी पालिकेसाठी व्यापाऱ्यांचा पुढाकारप्रांताधिकारी सीमा अहिरे व मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांच्याकडे साहित्य सुपूर्द