ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 9 - नवीन बसस्थानकात बसमध्ये चढणा:या एका वृध्द प्रवाशाचे 14 हजार रुपये लांबवून बसमध्ये प्रवासी म्हणून बसलेल्या चोरटय़ास शुक्रवारी दुपारी जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आह़े वृध्दाने सतर्कता दाखवित तत्काळ बस पोलीस ठाण्यात नेल्याने पोलिसांनी केलेल्या प्रवाशांच्या चौकशीत चोरटा सापडला़ विनोद धोंडीराम चव्हाण रा़ सिंदखेड राजा जि़बुलढाणा असे चोरटय़ाचे नाव आह़ेदयानंद आनंदराव बिरहारी (वय-80, रा़नेरीदिगर ता़जामनेर) हे आरोग्य विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी आह़े नेहमीप्रमाणे पेन्शनचे पैसे काढण्यासाठी बिरहारी हे सकाळी 9़30 वाजता नेरीहून जळगावला आल़े पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत खाते असल्याने तेथे पैसे काढण्यासाठी गेल़े खात्यावर 14 हजार रुपये घेतल़े हातरुमालात पैसे गुंडाळून खिशात ठेवले व पुन्हा गावाकडे परत जाण्यासाठी बसस्थानकात आल़े 11 वाजेच्या सुमारास जळगाव-जामनेर बसमध्ये (क्ऱ एम़एच 19 बी़टी़ 0102) चढत असताना त्याच्या खिशातून 14 हजार रुपये लांबविल़े बसमध्ये चढल्यावर सीटवर बसताना पैसे नसल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला़बसमध्ये चढत असताना हिसका देणा:या एकाने पैसे लांबविले व तो बसमध्ये चढल्याच्या संशयावरुन बिरहारी यांनी कुठलाही वेळ वाया न घालविता, प्रवाशांसह चालक व वाहकाला बस जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितल़े जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक सुनील गायकवाड यांच्यासह कर्मचारी ललित पाटील, शेखर जोशी, तुषार झंवर यांनी बिरहारी यांच्या सांगण्यानुसार बसमधील प्रवाशांची चौकशी केली़ मात्र यात कुणाजवळ पैसे आढळून आले नाही़प्रवाशांच्या चौकशीदरम्यान विनोद चव्हाण या प्रवाशावर पोलिसांना संशय आला मात्र त्याची झडती घेतली असता पैसे आढळून आले नाही़ यादरम्यान शेखर जोशी व तुषार झंवर यांनी बसमधील विद्यार्थिनींना व एका प्रवासी महिलेची विचारपूस केली़ त्यात विद्यार्थिनींनी चव्हाण याने बसमध्ये वरच्या कप्प्यात त्याची बॅग ठेवली व तो मागच्या बाजूस बसायला गेल्याची माहिती दिली़ पोलिसांनी बॅग तपासली असता, त्यात हातरुमाल ठेवलेले 14 हजार रुपये आढळून आल़े यानंतर पोलीस निरिक्षक सुनील गायकवाड यांनी वृध्द बिरहारी यांना त्यांचे पैसे परत केल़े याबद्दल बिरहारी यांनी पोलिसांचे आभार केल़े याप्रकरणी बिरहारी यांच्या फिर्यादी विनोद चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े