फावले आहे.अंधारामुळे चोरट्यांचा धुमाकूळ वाढला असून त्यांना अच्छे दिन आले आहेत. गावात तीन मोटरसायकली तर सुनगाव रोडवर एका ठिकाणी दोन मोबाईल
चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहे. गावात चोरीच्या घटना घडल्या असल्या तरी मात्र पोलिस
ठाण्यात याबाबत कुठलाही गुन्हा दाखल नाही.
लाखो
रुपयांच्या थकबाकीमुळे गावातील पथदिवे गेल्या आठवडाभरापासून बंद आहे गावात
भुरट्या चोरांचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणावर होत आहे. येथील राष्ट्रवादी
काँग्रेस कार्यालया समोरून सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद
रंधे यांची दुचाकी बुधवारी रात्री चोरीस गेल्याची घटना घडली. तर संतोष घोडकर
यांची घरासमोरून दुचाकी तर त्याच परिसरातून फकिरा मराठे यांची दुचाकी
गावातून चोरीस गेल्याची घटना घडली. संतोष घोडकर यांची गाडी रोडवर सापडली
असल्याचे सांगण्यात आले. गावात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी अपेक्षा व्यक्त
होत आहे दरम्यान गावात पथदिवे लवकर सुरू करण्यात यावे गावातील सर्व
लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन गावातील पथदिवे कसे सुरू करता येतील यावर तोडगा
काढावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.