जळगाव : पुष्पक एक्सप्रेसच्या दरवाजात बसून मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणाला चोरटय़ांनी मोबाईल लांबविण्यासाठी काठी मारुन फेकली. या घटनेत तरुण थेट रेल्वेखाली आल्याने त्याचे दोन्ही पाय कापले गेल्याची घटना मंगळवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास भुसावळ येथे घडली. अमान सादीक खान (वय 17 रा.कानपूर,ह.मु.सांताक्रूझ, मुंबई) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याला जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.अशी घडली घटनाकानपूर येथील अमान हा आई रिजवाना सादीक खान, बहिण सबा खान, मेहुणा मोहम्मद फैज, अकबर हुसेन,सानिया खान, रेशमा बेगम व दोन लहान मुले हे कानपुर येथील लगA आटोपून पुष्पक एक्सप्रेसने मुंबई येथे जात होते. सर्व जण शेवटच्या जनरल बोगीत बसलेले होते तर अमान हा दरवाजाजवळ मोबाईलवर बोलत उभा होता. मंगळवारी दुपारी साडे बारा वाजता या गाडीने भुसावळ स्थानक सोडले. पुढे पुलाजवळ आल्यानंतर रुळाच्या बाजूला हातात काठय़ा घेऊन थांबलेल्या तीन तरुणांपैकी एकाने मोबाईल खाली पाडण्याच्या उद्देशाने अमान याला काठी मारुन फेकली. त्यात अमान हा थेट खाली कोसळला व खडीला खरचटून दोन्ही पाय रेल्वेच्या चाकाखाली आले. हा प्रकार पाहून तरुणांनी तेथून पळ काढला तर गाडीची साखळी ओढून नातेवाईक खाली उतरले.पायाच्या दोन्ही तुकडय़ासह आणले जळगावातअमान याला रक्ताच्या थारोळ्यात पाहून नातेवाईक जागेवरच थरथरायला लागले. स्थानिक लोकांच्या मदतीने त्याला जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नातेवाईकांनी त्याचे दोन्ही पाय हातात धरुन आणले. नदीम मलिक, अरिफ अन्सारी, शेख इफ्तेखार, शेख गफ्फार, शेख शाहीद मलिक व वसीम शेख रशीद या जळगाव शहरातील तरुणांनी अमान याला खासगी रुग्णालयात दाखल केले. लगAासाठी गेले होते कानपूरलाअमान व त्याचा परिवार मुळचा कानपुरचाच आहे. मात्र रोजगारामुळे ते मुंबईत स्थलांतर झाले आहेत. सांताक्रुझ येथे चिकनचा त्यांचा व्यवसाय आहे. नातेवाईकाचे लगA असल्याने ते कानपूरला गेले होते. हे लगA आटोपून मुंबईला जात असताना ही घटना घडली. दरम्यान, अमान याने नुकतेच शिक्षण सोडले आहे. व्यवसायात हातभार लावून परिवाराला मदत करत होता. दरम्यान, रेशमा बेगम, सानिया खान व अन्य दोन लहान मुले असे चार जण गाडीतच पुढे निघून गेले. दुपारी त्यांना फोन करुन या घटनेची माहिती देण्यात आली.रेल्वेतून पडल्याने दापो:याचा तरुण जखमीमुंबई-भुसावळ या पॅसेंजरमधून पडल्याने नरेंद्र जगन्नाथ सोनवणे (वय 30 रा.दापोरा, ता.जळगाव) हा तरुण जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. म्हसावद स्थानक सोडल्यानंतर दुपारी चार वाजता हा अपघात झाला. नरेंद्र याचा उजवा पाय घुटण्याजवळ निकामी झाला आहे. परधाडे,ता.पाचोरा येथे तो लगAाला गेला होता. तेथून परत येत असताना ही घटना घडली.कब्रस्थानमध्ये दफन केले पायजळगावातील तरुण, भुसावळ लोहमार्ग पोलीस व नातेवाईकांनी खासगी दवाखान्यातून पायाचे दोन्ही तुकडे घेवून अजिंठा चौक रस्त्यावरील कब्रस्थानात दफन केले. संध्याकाळी उशिरार्पयतही अमान शुध्दीवर आलेला नव्हता. दरम्यान, या घटनेप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त असून त्यातील एक तरुण अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले.
चोरटय़ांनी काठी मारल्याने रेल्वेखाली पाय कापले
By admin | Published: February 22, 2017 12:35 AM