चोरीच्या घटनेने गरताड परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत शहर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गरताड येथे दि. ६ जुलै रोजी मध्यरात्री नंतर शामकांत रामदास पाटील यांच्या घराच्या मागील दरवाजाला असलेले कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून घरात अनधिकृतपणे घरात प्रवेश करून घरातील कपाट उचलून ती घराच्या मागील बाजूस असलेल्या शेतात घेऊन गेले.
कपाटात असलेले २८ हजार २०० रुपये किमतीचे त्यात ३ ग्रॅम वजनाचे सोने व ४८ भार चांदीचे दागिने, तसेच त्याच गल्लीतील रहिवासी भरत पंडित पाटील यांच्या घराच्या मागील दरवाजास असलेले कुलूप तोडून घरात प्रवेश करून त्यांचे घरातील कपाट उचलून ते घराच्या मागील बाजूस असलेल्या शेतात घेऊन जाऊन कपाटातील १ लाख ९१ हजार ४०० रुपये किमतीचे ५९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व सहा भार चांदीचे दागिने असा २ लाख १९ हजार ६०० रुपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला.
घरफोडीप्रकरणी शामकांत रामदास पाटील
(वय ६२, गरताड, ता. चोपडा) यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि कलम ३८०,४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजित साबळे हे करीत आहेत.