फैजपूर/भुसावळ, जि.जळगाव : फैजपूर येथील डॉ.शैलेंद्र खाचणे यांना २५ लाखाची खंडणी मागणाऱ्या तिसºया आरोपीला सोमवारी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने पकडले. श्याम पुनाजी इंगळे (रा.शिव कॉलनी, फैजपूर) असे या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता. इंगळे याला फैजपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.फैजपुरातील डॉ.शैलेंद्र खाचणे यांना श्याम पुनाजी इंगळे, शांताराम मांगो तायडे (रा.हिंगोणा), शेख युनूस उर्फ गबल्या या तिघांनी जमिनीच्या वादातून २५ लाखांची खंडणी मागितली होती. त्यानंतर या तिघांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता यापूर्वीच शांताराम तायडे व शे. युनुस या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र श्याम इंगळे हा पोलिसांना गुंगारा देत फिरत होता. सोमवारी इंगळे हा भुसावळातील डॉ.नीलेश महाजन यांच्या दवाखान्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई भुसावळ बाजारपेठचे पोलीस निरीक्षक देवीदास पवार, फौजदार सलीम पठाण, छोटू वैद्य यांनी केली. त्यानंतर इंगळे याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तपास सपोनि दत्तात्रय निकम फौजदार जिजाबराव पाटील, पो.कॉ.रमण सुरळकर, किरण चाटे करीत आहे.
फैजपूरच्या डॉक्टरला २५ लाखांची खंडणी मागणारा तिसरा आरोपीही अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 9:49 PM
फैजपूर/भुसावळ , जि.जळगाव : फैजपूर येथील डॉ.शैलेंद्र खाचणे यांना २५ लाखाची खंडणी मागणाऱ्या तिसºया आरोपीला सोमवारी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने पकडले. श्याम पुनाजी इंगळे (रा.शिव कॉलनी, फैजपूर) असे या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता. इंगळे याला फैजपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.फैजपुरातील ...
ठळक मुद्देयाआधीच दोन आरोपींना झालेली आहे अटकतिसरा आरोपी तीन महिन्यांपासून होता फरार