पहूर, ता जामनेर: जामनेर - पहूर रोडवर अपघाताची मालिका सुरुच असून गुरुवारी झालेल्या चार वाहनांच्या अपघात तिघे ठार झाले तर सात जण जखमी झाले आहेत.ही दुर्घटना सकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली. यात बाबुलाल गुलाबसिंग पावरा व त्यांची पत्नी मंगला पावरा (डोंगरकठोरा ता. यावल) हे जागीच ठार झाले तमर त्यांची मुलगी राधा (वय ५ हिचा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. या रस्त्यावरील दीड महिन्यातील हा तीसरा अपघात आहे. अपघाताच्या या मालिकेने प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे.या अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास एम एच४५-१६९६ क्रमांकाची मालवाहू गाडी पहूर कडून जामनेर कडे जात होती. यादरम्यान एम एच १७ एपी.७६३४ क्रमांकाच्या दुचाकीवरून यावल तालुका कठोरा येथील रहिवासी बाबुलाल गुलाब सिंग पावरा व त्यांची पत्नी मंगला यांच्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या या मालवाहू गाडीने चिरडले. याचवेळी एम एच २० - ३१३७ क्रमांकाच्या रिक्षा व अन्य दुसºया दुचाकी स्वाराला चिरडले. या चार वाहनांच्या अपघातात पावरा दामपत्याचा जागीच मृत्यू झाला तर राधा पावारा( ५) ही त्यांची चिमुरडी अत्यवस्थ झाल्याने तिला जामनेर उपजिल्हा रुग्णालयातून तिला जळगाव येथे सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र तिच्यावही काळाने झडप घातली.जखमीची नावेअपघातातील जखमी बिलकेस चौधरी(१८), रज्जाक भोजू चौधरी(४), रोहन चौधरी (१४), सोहल चौधरी (११), रुकसार चौधरी(१६), साबेरा रज्जाक चौधरी(४०),हे सर्व मुळ रहिवासी शिरपूर कान्हळदा ता भुसावळचे असून जालना येथे ते रिक्षाने जात होते. तर सुशिल काटकर हे दुचाकीने पहूरकडे येत असताना या अपघातात सापडले. सर्व जखमींवर जामनेर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.कामसाठी जाणारे पावरा कुटुंब झाले उध्वस्तयावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील बाबुलाल गुलाबसिंग पावरा पत्नी मंगला व चिमुरडी राधाला यांना घेऊन दुचाकीवरून कामासाठी संगमनेर जि. अहमदनगर येथे निघाले होते. मात्र या अपघातात हे पावरा कुटुंब उध्वस्त झाले आहे.अनेकांचे मदतकार्यघटनास्थळी साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे, शशीकांत पाटील, प्रदिप चौधरी, ईश्वर देशमुख, नवल हटकर, उपसरपंच श्यामराव सावळे, माजी सभापती बाबुराव घोंगडे, नवलसिंग राजपूत, डॉ. अमित सोमकुवंर, जालमसिंग राजपूत, अशोक सुरवाडे यांच्यासह उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करून उपजिल्हा रुग्णालयात जखमींना पाठविले.मालवाहू वाहन चालकाला अटकरज्जाक चौधरी यांच्या फिर्यादिवरून मालवाहू वाहन चालक डिगंबर विश्वनाथ काळे रा, जवळगाव ता. बार्शी जि. सोलापूर याच्या विरुद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.प्रवाशांची सुरक्षा धोक्यातजामनेर पहूर रस्त्याचे काम धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे रस्ता अरूंद असल्यामुळे जातांना- येतांना वाहनचालकांना कसरत करावी लागत असून दुचाकी स्वारांना जीवमुठीत घेवून वाहन चालवावे लागत आहे. गेल्या चार दिवसांपूर्वीच टँकर खाली दबून याच रस्त्यावर चालकाचा मृत्यू झाला आहे. तर एक महिन्यापूर्वी मोयगांव येथील तरूणाचा पाण्याच्या टँकर खाली दबून मृत्यू झाला. रस्त्याच्या समस्येमुळे अपघाताची मालिका सुरूच आहे. या रस्त्याने दिड महिन्यातच पाच बळी घेतले आहे.
दामपत्यासह चिमुरडीचा करुन अंत, सात जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 9:35 PM