शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

‘त्या’ तीनही पोलिसांवर निलंबनाची कोसळणार कु-हाड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:07 PM

 जिल्हा कारागृहात असलेल्या दोन आरोपींनी बाहेर येत  अरूण भिमराव गोसावी (४३, रा. तुकाराम वाडी) याला मारहाण करीत चारचाकी वाहनात डांबून ठेवले आणि एवढेच नाही तर जिल्हा कारागृहाजवळ नेऊन सोडून दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हवालदार मुकेश आनंदा पाटील, सुरेश श्रीराम सपकाळे व कॉन्स्टेबल गोरख हिंमतराव पाटील या तीनही  पोलिसांवर निलंबनाचीही कु-हाड कोसळणार असल्याचे संकेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिले.

ठळक मुद्दे तिघांना अटकचिंग्याचाही ताबा घेणार पोलीस कारागृह उपमहानिरीक्षकांनी घेतली दखल

जळगाव:  जिल्हा कारागृहात असलेल्या दोन आरोपींनी बाहेर येत  अरूण भिमराव गोसावी (४३, रा. तुकाराम वाडी) याला मारहाण करीत चारचाकी वाहनात डांबून ठेवले आणि एवढेच नाही तर जिल्हा कारागृहाजवळ नेऊन सोडून दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हवालदार मुकेश आनंदा पाटील, सुरेश श्रीराम सपकाळे व कॉन्स्टेबल गोरख हिंमतराव पाटील या तीनही  पोलिसांवर निलंबनाचीही कु-हाड कोसळणार असल्याचे संकेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिले.

चंद्रकांत सुरेश पाटील या तरुणाचा १४ मे २०१५ रोजी चाकूने भोसकून खून झाला होता. याप्रकरणात चेतन उर्फ चिंग्या सुरेश आळंदे याच्यासह सहाजणांविरुध्द दाखल झाला असून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. १३ जून रोजी या खटल्याची न्यायालयात तारीख होती. त्यासाठी चिंग्याला कारागृहातून न्यायालयात आणण्यात आले होते. त्याच्या दिमतीला मुख्यालयाचे  हवालदार मुकेश आनंदा पाटील, सुरेश श्रीराम सपकाळे व कॉन्स्टेबल गोरख हिंमतराव पाटील हे कर्मचारी देण्यात आले होत. सकाळी १०.३५ ला चिंग्याला कारागृहातून बाहेर काढण्यात आले तर रात्री ११ वाजता त्याला परत कारागृहात नेण्यात आले होते. या कालावधीत त्याने मद्यप्राशन करुन अरुण भीमराव गोसावी यांना मारहाण केली होती. याप्रकरणात चिंग्या, त्याचा साथीदार व तीन पोलिसांवर गुन्हा दाखल झाला होता. शनिवारी रात्री या पोलिसांना अटक करण्यात आली.

चिंग्याला इतरत्र हलविणार?चिंंग्याच्या तक्रारी व वारंवार होणारे प्रकार पाहता त्याला नाशिक किंवा पुणे कारागृहात हलविण्यात येण्याची शक्यता असून कारागृहाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी तसे संकेतही दिलेले आहेत. प्रभारी अधीक्षक अनिल वांढेकर यांनी प्राथमिक माहिती वरिष्ठांना कळविलेली आहे. कारागृहात झालेल्या प्रकाराला कारागृह प्रशासन जबाबदार असते, तर न्यायालयीन तारखेवर आरोपीला बाहेर घेऊन जाताना मुख्यालयाच्या पोलिसांच्या ताब्यात दिले जाते. तशा येण्याच्या व जाण्याचा नोंदी घेतल्या जातात. त्यामुळे बाहेर झालेल्या प्रकाराला पोलीसच जबाबदार असले तरी अंतर्गत प्रकरणाचीही माहिती मागविल्याचे देसाई यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.

न्यायालयातील काम झाल्यानंतर चिंग्या खासगी कारने (क्र.एम.एच.१९ सी.यु.८५००) शहरात फिरल्यानंतर रात्री तुकारामवाडीत गेला होता. चुलत सासरे व पत्नीला भेटल्यानंतर रात्री ९.४० वाजता तो घराबाहेर पडला. नंतर गल्लीत बाहेर थांबलेल्या  अरुण भिमराव गोसावी (४३, रा.तुकारामवाडी) यांना चिंंग्या, गोलु उर्फ लखन दिलीप मराठे (शिवाजी नगर) व त्याच्या दिमतीला असलेल्या पोलिसांनी मारहाण केली त्यानंतर कारमध्ये डांबून ठेवत कारागृहाच्या बाहेरही मारहाण केल्याची तक्रार गोसावी यांनी दिल्यावरुन एमआयडीसी पोलिसात तीन पोलीस, चिंग्या व त्याचा साथीदार गोलु यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव