जळगाव : लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा दिवस उजाडला तरी अद्यापही उमेदवारांनी प्रचाराचा संपूर्ण खर्च निवडणूक खर्च शाखेस सादर केलेला नसून अनेकांनी तपासणीसही दांडी मारली आहे.उमेदवारांनी १८ एप्रिलपर्यंतच खर्च सादर केला आहे. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी सर्वाधिक ४४ लाख ४३ हजार रुपये खर्च सादर केला आहे. त्यांचे प्रतीस्पर्धी भाजप शिवसेना युतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांनी ३५ लाख ६४ हजार खर्च सादर केला.रावेर लोकसभा मतदार संघात कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांनी ४६ लाख ७९ हजार तर भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी ४१ लाख ८७ हजारांचा खर्च सादर केला आहे.जळगाव लोकसभा मतदार संघातील इतर उमेदवारांचा खर्च या प्रमाणे - वंचित बहुजन आघडीच्या उमेदवार अंजली बाविस्कर यांचा खर्च ३ लाख ३१ हजार, संत श्री बाबा महाहंसजी महाराज १ लाख २५ हजार, मोहन बिºहाडे ७१ हजार, ईश्वर दयाराम मोरे ६९ हजार, रुपेश संचेती यांनी ४९ हजार, ललित शर्मा ३४ हजार, अनंत महाजन २९ हजार, शरद भामरे २६ हजार, ओंकार जाधव २५ हजार, मुकेश कुरील २१ हजार, राहुल बनसोडे २९ हजार तर सुभाष खैरनार १५ हजार रुपये एवढा खर्च झाला आहे.
मतदानाचा दिवस उजाडला तरी उमेदवारांकडून संपूर्ण खर्च सादर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:55 PM