आत्महत्या करण्यासाठी शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहचतात तरी या सरकारला संवेदना नाही : खासदार अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 03:10 PM2018-01-24T15:10:31+5:302018-01-24T15:19:40+5:30

शेतकरी आत्महत्या करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत धाव घेत आहे तरी देखील या सरकारला संवेदना नसल्याने सर्वसामान्य जनतेच्या काँग्रेसकडून अपेक्षा वाढल्या असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी जळगावात केले.

Though the farmers reach the Chief Minister's death to commit suicide, the government does not have any sympathy: MP Ashok Chavan | आत्महत्या करण्यासाठी शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहचतात तरी या सरकारला संवेदना नाही : खासदार अशोक चव्हाण

आत्महत्या करण्यासाठी शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहचतात तरी या सरकारला संवेदना नाही : खासदार अशोक चव्हाण

googlenewsNext
ठळक मुद्देअशोक चव्हाण म्हणाले...हे तर मस्तवाल सरकारराज्यघटनेतील बदलाचा डाव हाणून पाडूसरकार कसं चालवाव हे त्यांना कळत नाही

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२४ : शेतकरी, शेतमजुर यांची महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती आहे. शेतकरी आत्महत्या करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत धाव घेत आहे तरी देखील या सरकारला संवेदना नसल्याने सर्वसामान्य जनतेच्या काँग्रेसकडून अपेक्षा वाढल्या असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी जळगावात केले.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हा काँग्रेसचे व्हीजन २०१९ या शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंतराव पुरके, जिल्हा प्रभारी विनायकराव देशमुख, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. भाजपा सरकार घोषणा करीत असताना अंमलबजावणी मात्र करीत नाही. या सरकारला कधी खाली खेचू या भूमिकेत सर्वसामान्य जनता आहे. उद्योग आणि आर्थिक यशाचे शिखरे गाठणारा महाराष्ट्र आज शेतकरी आत्महत्येत उच्चांक गाठत आहे. महाविद्यालयातून प्रत्येक वर्षाला अनेक विद्यार्थी बाहेर पडत आहेत. मात्र हे सरकार त्यांना रोजगार देण्यासाठी अपयशी ठरले आहे.
सरकारच्या विरोधात बोलल्यास तुमच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी हे सरकार करीत असते. सध्या राज्यात अघोषित आणिबाणी सारखी स्थिती आहे. यासाºयात काँग्रेसची भूमिका काय? याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हे तर मस्तवाल सरकार
गेल्या वेळी काँग्रेसची सत्ता गेली त्यामुळे निराश नाही. सत्ता ही येत-जात राहते. मात्र बहुमताच्या बळावर आम्ही काहीही करू ही मस्तवाल भूमिका या सरकारची आहे. त्यामुळे या सरकारविरोधात संघर्ष करण्याची आवश्यकता आहे.
राज्यघटनेतील बदलाचा डाव हाणून पाडू
भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देशाची राज्यघटना बदलविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी ते आतापासून चाचपणी करीत आहेत. राज्यघटनेला धक्का लावण्याचा प्रयत्न आम्ही कदापि सहन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार कसं चालवाव हे त्यांना कळत नाही
भाजपा व शिवसेनेला सत्तेत येऊन तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला. मात्र अजून त्यांना सरकार कसे चालवावे हे समजत नाही.

Web Title: Though the farmers reach the Chief Minister's death to commit suicide, the government does not have any sympathy: MP Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.