गणेश वाघ/ ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.9 : शासनातर्फे या वर्षापासून विद्याथ्र्याच्या थेट बँक खात्यात गणवेशाची रक्कम जमा करण्यात येत आहे. मात्र दोन गणवेशांसाठी मिळणा:या 400 रुपयांसाठी पालक व विद्याथ्र्याचे संयुक्त खाते काढण्यासाठी तब्बल हजार रुपये खर्च येणार असल्याने पालकांचा मनस्ताप वाढला आह़े दुसरीकडे मुख्याध्यापकांचीही बँक खाते उघडण्यासाठी चांगलीच दमछाक होत आह़े विशेष म्हणजे बँक खात्यात रक्कम जमा करण्यापूर्वी पालकांनी गणवेश खरेदी करून त्याची पावती मुख्याध्यापकांना सादर करावयाची आह़े
6034 विद्यार्थी, 24 लाख अनुदान हवे
भुसावळ तालुक्यातील जि़प़च्या 69 व नगरपालिकेच्या 18 शाळा मिळून 6 हजार 34 विद्यार्थी आहेत़ या विद्याथ्र्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मुले व बीपीएल प्रवर्गाचा समावेश आहे. तर सर्वच प्रवर्गातील मुलींना गणवेश देण्याचे शासनाचे नियोजन आह़े विद्याथ्र्यासाठी प्रत्येकी 200 रुपये गणवेश अनुदान स्वरूपात दिले जाते. तर दोन गणवेशासाठी एकूण 400 रुपये प्रमाणे अनुदान दिले जात़े या विद्याथ्र्यासाठी 24 लाख 13 हजार 600 रुपये अनुदानाची मागणी शासनाकडे नोंदवण्यात आली आहे. मात्र अद्यापही अनुदान प्राप्त झालेले नाही़
निधीची प्रतीक्षा कायम
गतवर्षीदेखील जून महिन्यात विद्याथ्र्याना गणवेश मिळाले नव्हते. यावर्षीदेखील निधी मिळाला नसल्याने तसेच बँक खाते उघडण्याच्या जाचक अटीमुळे पालकांमध्ये गणवेश घेण्याबाबत उदासीनता असल्याचे चित्र आह़े
पावती दाखविल्यानंतरही विद्याथ्र्याच्या खात्यात जमा होणार रक्कम
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी-पालकांच्या संयुक्त खात्यात गणवेशाची 400 रुपये रक्कम जमा होणार आह़े ही रक्कम जमा होण्यापूर्वी विद्याथ्र्याच्या पालकांनी विद्याथ्र्यासाठी दोन गणवेशाची खरेदी करून त्याची पावती (खरेदी बिल) मुख्याध्यापकांना द्यावे लागणार आहे. ही पावती सादर झाल्यानंतर मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समिती धनादेश खात्यावर जमा करणार आह़े
ङिारो बॅलन्सवर खाते उघडण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांची उदासीनता आह़े 400 रुपये एकदा पालकाला मिळाल्यानंतर त्या खात्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे बँकांनाही भरूदड बसत असल्याने त्यांनी किमान खाते उघडण्यासाठी पाचशे ते हजार रुपये बॅलन्स ठेवणे बंधनकारक केले आहे. तर काही ठिकाणी शंभर रुपयात खाते उघडले जात आह़े
मुख्याध्यापकांना मनस्ताप
जि़प़शाळा या ग्रामीण भागात असल्याने त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँका नाहीत़ अशा परिस्थितीत मुख्याध्यापकांना खाते उघडण्यासाठी विद्यार्थी व पालकांचे कागदपत्रे गोळा करावे लागत असल्याने त्यांना मनस्ताप होत आहे.