लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संकेतस्थळावर काही महिन्यांपूर्वी पीएच.डी. गाईडची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार खान्देशातील हजाराच्यावर पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांना गाईड उपलबध करून देण्यात आले असल्याची माहिती विद्यापीठाच्या पीएच.डी.विभागाकडून देण्यात आली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातंर्गत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे हजाराच्यावर विद्यार्थी विविध विषयांवर संशोधन अर्थात पीएच.डी करीत आहेत. पीएच.डी.ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात विद्यापीठाकडून गाईड उपलब्ध करून देण्यात आले होते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर गाईडचे नाव, पद तसेच मोबाईल क्रमांक व कुठल्या महाविद्यालयात कार्यरत आहेत, याची यादी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान, अजूनही काही बोटावर मोजण्याइतक्या पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांना गाईड उपलब्ध झालेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना पुढील टप्प्यात गाईड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या पीएच.डी.विभागाकडून देण्यात आली आहे.