चोपडा, ता. जळगाव : चोपडा सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शिवसेनेच्या एका गटाने विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन केले. घंटानाद करणाºया शिवसेनेच्या एका गटाच्या पदाधिकाºयांना पोलिसांनी अटक केली. त्यात पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर, अॅड एस. डी. सोनवणे, तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, शहर अध्यक्ष नरेश महाजन, पालिकेतील विरोधी पक्ष नेता महेश पवार यांच्यासह शिवसेनेच्या ५० कार्यकर्त्यांना अटक केली आहे.चोपडा सहकारी साखर कारखान्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक असून राष्ट्रवादीचे नेते म्हणून अरुणभाई गुजराथी यांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात आले. गुजराथी यांच्या घरी सकाळी नऊ वाजेपासून राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी जवळपास ५०० पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले होते.
विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्याघरासमोर घंटानाद, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:35 PM