शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

जळगावात गीता पठण स्पर्धेमध्ये हजार विद्यार्थी सहभागी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2017 11:22 PM

अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठान व केसीईच्या विविधता संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्यावतीने रविवार, ८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जिल्हास्तरीय श्रीमद् भगवतगीता

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 05 -  अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठान व केसीईच्या विविधता संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्यावतीने रविवार, ८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जिल्हास्तरीय श्रीमद् भगवतगीता पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या स्पर्धेत यंदा जिल्ह्यातील १४ शाळांच्या ९०० विद्यार्थ्यांची आतापर्यंत नोंदणी झाली असून त्यात आणखी वाढ होणार आहे. १३ वर्षांपासून आयोजनशालेय विद्यार्थ्यांवर सुसंस्कार व्हावा, अध्यात्मिक ग्रंथाचा परिचय व्हावा, त्यांची पठण क्षमता वाढावी यासाठी गेल्या १२ वर्षांपासून अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठान व केसीईच्या विविधता संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा स्पर्धेचे १३वे वर्ष आहे. सकाळी १० वाजता उद््घाटनया स्पर्धेचे रविवार, ८ रोजी सकाळी १० वाजता खान्देश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या अध्यक्षतेखाली उद्््घाटन होणार आहे. या सोबतच बक्षीस वितरण व समारोप समारंभ दुपारी साडेतीन वाजता प्राचार्य अनिल राव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. एक हजार विद्यार्थ्यांचा असणार सहभागया स्पर्धेसाठी विविध गट तयार करण्यात आले असून वेगवेगळे अध्याय व श्लोक घेतले जाणार आहे. या स्पर्धेसाठी आतापर्यंत शहरातील ११ व ग्रामीण भागातील ३ अशा एकूण १४ शाळांच्या ९०० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून त्यात आणखी वाढ होऊन एक हजार विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार असल्याचे सांगण्यात आले. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना वैयक्तिक व सांघिक स्तरावरील विविध पारितोषिके व प्रमाणपत्र तसेच स्पर्धेत नेहमी सहभागी होत आलेल्या शाळा, मुख्याध्यापकांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. स्मृती प्रित्यर्थ यंदा विशेष उपक्रमविद्यार्थ्यांच्या गीता पठणसाठी सदैव अग्रेसर राहिलेल्या विविधता संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक प्रा. व्ही.जी. चौधरी, प्राचार्य बी.एम. भारंबे, उपप्राचार्य ए.डी. बोंडे यांचे निधन झाल्याने त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ यंदा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. स्पर्धेच्या उद्घानादरम्यान त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यात येणार आहे.