संजय पाटीलअमळनेर : तालुक्यातील दहिवद येथे बिहार पॅटर्न अंतर्गत गुरुवारी एका मिनिटात हजारो झाडे लावण्यात आली. महिला, ग्रामस्थ तसेच शालेय विद्यार्थी एका दिवसात १० हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार आहेत.सरपंच सुषमा देसले यांनी महात्मा गांधी रोजगार योजनेतून बिहार पॅटर्न राबवण्यासाठी महिलांची टीम बनवून गावात ११ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट हाती घेतले. ओम च्या मंत्रोच्चारात एकाच मिनिटात हजारो झाडे लावण्यात आली. यावेळी दिनेश पाटील(उद्योगपती, छत्तीसगड), सुनील सूर्यवंशी (जिल्हा पुरवठा अधिकारी), अजय तिवारी (बेटी बचाव बेटी पढाव संयोजक छत्तीसगड), निलेश भदाणे (नगर जिल्हा नियोजन अधिकारी), तालुका कृषी अधिकारी भारत वारे, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे , सहायक गटविकास अधिकारी संदीप वायाळ, विद्याधर पाटील (धुळे तालुकापंचायत समिती उपसभापती), जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, पाणी फौंडेशनचे सुखदेव भोसले, सरकारी वकील ऍड शशिकांत पाटील , ऍड तिलोत्तमा पाटील , बाजार समितीचे माजी संचालक विजय पाटील, सानेगुरुजी स्मारक समिती कार्यवाह दर्शना पवार, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, भास्कर बोरसे, उपसरपंच सुनील पाटील, ग्रामसेवक संजीव सैंदाणे , गुलाबराव बोरसे हजर होते. उदघाटन मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजनाने करण्यात आले. सूत्रसंचालन सुशील भदाणे यांनी केले.
दहिवद येथे बिहार पॅटर्न अंतर्गत एका मिनिटात लावली हजारो झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2021 11:35 AM