भुसावळ, जि.जळगाव : माझ्या प्रभागात मला न विचारता तू कर्मचारी कसे पाठवले, असा प्रश्न उपस्थित करून पाणीपुरवठा समितीचे सभापती राजेंद्र नाटकर यांनी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पालिकेचे कनिष्ठ विद्युत पर्यवेक्षक सूरज नारखेडे यांनी शहर पोलीस स्टेशनला दिली आहे. दरम्यान, अर्जाची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती प्रभारी निरीक्षक चंद्रकांत कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.प्रभाग क्रमांक पाचमधील नगरसेविका वैशाली पाटील यांचे पती ललित मराठे यांनी, ४ रोजी वॉर्डातील लाईट बंद असल्यामुळे कर्मचारी पाठव म्हणून मोबाइलवरून सांगितले. कर्मचारी उपलब्ध झाल्यानंतर कर्मचारी पाठवण्यात आले. मात्र शुक्रवारी सकाळी ९.३३ वाजेच्या सुमारास पाणीपुरवठा समितीचे सभापती नाटकर यांनी ‘तू माझ्या प्रभागात कर्मचारी कसे पाठवले’, असा प्रश्न उपस्थित करून जीवे मारण्याची धमकी दिली.सूरज नारखेडे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पालिकेतील कार्यालय अधीक्षक अख्तर खान, पाणीपुरवठा पर्यवेक्षक गणेश लाड, प्रभारी लिपिक सचिन नारखेडे, रवींद्र पाठक यांच्यासह सुमारे २० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.दरम्यान , कर्मचारी नारखेडे यांचा अर्ज आला आहे. या अर्जावर तक्रारदार व नाटकर यांना बोलविण्यात येईल, अशी माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक चंद्रकांत कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली, तर नाटकर यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
भुसावळ पालिकेच्या पाणीपुरवठा सभापतींकडून विद्युत पर्यवेक्षकास जीवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 1:31 AM
माझ्या प्रभागात मला न विचारता तू कर्मचारी कसे पाठवले, असा प्रश्न उपस्थित करून पाणीपुरवठा समितीचे सभापती राजेंद्र नाटकर यांनी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पालिकेचे कनिष्ठ विद्युत पर्यवेक्षक सूरज नारखेडे यांनी शहर पोलीस स्टेशनला दिली आहे.
ठळक मुद्देमला न विचारता कर्मचारी कसे पाठवले यावरून तक्रारअर्जाची चौकशी करणार- पोलीस निरीक्षक कुंभार