यावल, जि.जळगाव : शेतात अवैध लाकूड टाकून फसविण्याची धमकी देवून ९३ हजार रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी मुबारक नबाब तडवी याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील कोळवद येथील अरुण टोपा महाजन या शेतकऱ्यास तुझ्या शेतात अवैध लाकूड टाकून तुला वनविभागाच्या जाळयात फसविन, अशी धमकी परसाळे येथील संशयित आरोपी मुबारक नबाब तडवी याने दिली. वेळोवेळी महाजन यांच्याकडून वेळोवेळी मागणी केल्यानुसार त्यास ९३ हजार रुपये दिले. त्याने पुन्हा जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. तेव्हा घाबरलेल्या महाजन यांनी हा प्रकार आपल्या भावास सांगितला. तेव्हा दोघा भावांनी शनिवारी येथील पोलीस ठाण्यात संबंधिताविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी, हवालदार महेबूब तडवी, शिकंदर तडवी करीत आहे.
शेतात अवैध लाकूड टाकण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 6:21 PM
शेतात अवैध लाकूड टाकून फसविण्याची धमकी देवून ९३ हजार रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.
ठळक मुद्देयावल पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखलसंशयित परसाळे येथील