अमळनेर : बेटावद कडून अमळनेर कडे गुटखा वाहतूक करणाऱ्या एक वाहनाला मारवड पोलिसांनी गळवडे शिवारात पकडून वाहनासह साडे तीन लाखाचा माल जप्त केला.उप विभागीय पोलिस अधिकारी रफीक शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्या पथकाने १६ रोजी रात्रीच्या ८ वाजता नाकेबंदीदरम्यान अमळनेर-बेटावद रस्त्यावर गलवाडे शिवारातील गावालगतच्या पेट्रोल पंप जवळ एका वाहनात ताडपत्री झाकून जात असताना ते वाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी अडविले. त्यावेळी वाहनाची झडती घेतली असता त्या वाहनात गुटखा असल्याचे निदर्शनास आल्याने वाहन व मुद्देमाल तसेच वाहन चालकास पोलीस ठाण्यात आणले. या वाहनात २ लाख ८८ हजाराचा गुटखा व ७१ हजारच्या तंबाखूच्या पुड्या असलेल्या ८० पिशव्या आढलल्या. गुटख्याची मुद्देमाल सह एकूण ३ लाख ६० रुपयांचा गुटखा व २ लाखाचे वाहन (क्रमांक एम. एच. १२, जे. एफ. ३७१९) व मुद्देमाल जप्त केला असून वाहन चालक वासुदेव रामलाल पाटील (वय २६, रा. रामेश्वर, ता. अमळनेर, ह. मु. फुलपाठ, ता धरणगाव) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकूण ५ लाख ६० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी पोलीस ठाण्यात जप्त केला आहे. हा गुटख्याचा माल वाहन चालक याचा मावस भाऊ योगेंद्र पाटील यांच्या सांगण्यावरुन नरडाना बस स्टँड चौकातून एका अज्ञात व्यक्तीने भरून दिला व वाहन माझ्या ताब्यात दिल्याने मी अमळनेर येथे ट्रिप पोहचती करायची म्हणून माल घेऊन जात आहे असे वाहन चालक वासुदेव पाटील याने पोलिसांना सांगितले.सहाय्यक फौजदार भागवत पाटील, हवालदार संजय पाटील, पोलीस नाईक सुनील अगोने, पोलीस सुनील तेली, वाहन चालक पोलीस विजय होळकर यांच्या पथकाने कारवाई केली.रात्री उशिरापर्यंत गुटख्याचे मोजमाप सुरू होते. अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त योगेश बेंडकुळे व अन्न सुरक्षा निरीक्षक किशोर आत्माराम साळुंखे यांना या बाबत माहिती देण्यात आली. अमळनेर तालुक्यातील १५ दिवसात ही दुसरी कारवाई आहे.
साडेतीन लाखाचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:52 AM