ऑनलाईन लोकमत
शिरपूर,दि.22 - लाचलुचपत विभागाने सावेरचे ग्रामसेवक राहूल भिका रायसिंग यांना 2 हजाराची लाच घेताना तर दुकान निरीक्षक भारती विश्राम पावरा आणि खाजगी इसम प्रदीप पाटील यांना एक हजाराची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे.
सावेर-गोदी ग्रामपंचायत अंतर्गत एका तक्रारदाराने ग्रामरोजगार सेवक म्हणून सप्टेंबर ते नोव्हेंबर 2016 दरम्यान महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमार्फत काम केले होत़े सदर कामाचे मानधन 17 हजार 394 व मागील कामाचे 7 हजार रूपये असे एकूण 24 हजार 394 एवढी रक्कम शासनाकडून ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांच्या बँक खात्यात जमा झाली़ सदर मानधनाचा चेक घेण्यासाठी तक्रारदार ग्रामसेवक रायसिंग यांच्याकडे गेलेत, मात्र त्यांनी दोन हजाराची लाच मागितली होती.
दुस:या घटनेत शिरपुरातील रेडीमेड दुकानाचे स्थलांतर झाले होते. शॉप अॅक्ट लायसन्समध्ये व्यवसायाच्या पत्यातील बदल नोंदविणेसाठी दुकान मालकाकडून एक हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी खाजगी इसम (पंटर) प्रदीप पाटील व दुकान निरीक्षक कार्यालयातील दुकान निरीक्षक भारती विश्राम पावरा यांना अटक करण्यात आली.