आॅनलाईन लोकमतजळगावदि,२६ : औद्यागिक वसाहतमधील गितांजली केमिकल्समधील स्फोट प्रकरणात पोलिसांनी कारखाना व्यवस्थापक जितेंद्र यशवंत पाटील (वय ४९ रा.चंद्रप्रभा कॉलनी, जळगाव), प्रॉडक्शन मॅनेजर दिलीप दयाराम इंगळे (वय ५३ रा.यशवंत नगर, जळगाव) व रात्रपाळीचे सुपरवायझर श्रीकांत कांतीलाल काबरा (वय ४६ रा. नवप्रभात हौसिंग सोसायटी, उदय कॉलनी, जळगाव) या तिघांना अटक करण्यात आली आहे. औद्यागिक वसाहतमधील गितांजली केमिकल्समध्ये ७ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता भीषण स्फोट झाला होता.या दुर्घटनेत पाच कामगारांचा मृत्यू तर चार कामगार गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला कंपनीचे कार्यकारी संचालक सुरेंद्रकुमार मोहता, मधू सुरेंद्र मोहता व मवन कुमार देवरा यांच्यासह कारखाना व्यवस्थापक जितेंद्र यशवंत पाटील, प्रॉडक्शन मॅनेजर दिलीप दयाराम इंगळे व रात्रपाळीचे सुपरवायझर श्रीकांत कांतीलाल काबरा या सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. कार्यकारी संचालकांना अटक नाहीदीड महिन्यानंतर तीन जणांना पोलिसांनी अटक केली. मुख्य संचालकांना मात्र अद्याप अटक झालेली नाही. दरम्यान, अटकेतील तिघांना तपासाधिकारी उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या पथकातील सुनील पाटील यांनी न्या.बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.दरम्यान, या घटनेसंदर्भात पोलिसांनी वारंवार पत्रव्यवहार करुनही कारखाना निरीक्षकांनी तपासणी अहवाल दिलेला नाही. स्फोटातील अन्य पुरावे गोळा करणे, संचालकांचा शोध घेणे व स्फोटाचे मुळ कारण शोधणे यासाठी पोलिसांनी आरोपींची पाच दिवसाची कोठडी मागितली होती. न्यायालयाने एक दिवसाची कोठडी सुनावली.
जळगावमधील गीतांजली केमिकल्स कंपनीच्या व्यवस्थापकासह तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 9:37 PM
औद्यागिक वसाहतमधील गितांजली केमिकल्समधील स्फोट प्रकरणात पोलिसांनी कारखाना व्यवस्थापक जितेंद्र यशवंत पाटील (वय ४९ रा.चंद्रप्रभा कॉलनी, जळगाव), प्रॉडक्शन मॅनेजर दिलीप दयाराम इंगळे (वय ५३ रा.यशवंत नगर, जळगाव) व रात्रपाळीचे सुपरवायझर श्रीकांत कांतीलाल काबरा (वय ४६ रा. नवप्रभात हौसिंग सोसायटी, उदय कॉलनी, जळगाव) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे७ जानेवारीला झाला होता कंपनीत स्फोट पाच जणांचा मृत्यू झाला होताकारखाना निरीक्षकांच्या अहवालाची प्रतिक्षाच