जळगाव : दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात सराईत असलेला राकेश समाधान लोणारी (रा.जामनेर), चेतन ईश्वर संग्रामे (रा.जामनेर, ह.मु.शिरपुर) व सागर शिवराम शिरसाठ (रा.बीडकीन, ता.पैठण, जि.औरंगाबाद) या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.जामनेर येथे राकेश लोणारी याच्याकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांना मिळाली होती. त्यानुसार रोहोम यांनी खात्री व अधिक तपासासाठी सहायक निरीक्षक महेश जानकर, उपनिरीक्षक सुधाकर लहारे, अशोक काझी, युनुस शेख, सूरज पाटील, प्रकाश महाजन, विकास वाघ, दादाभाऊ पाटील, योगेश वराडे, गफूर तडवी, इद्रीस पठाण व दर्शन ढाकणे यांचे पथक नेमले होते. या पथकाने राकेश याला जामनेरमध्ये पकडून चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीची कबुली देण्यासह आणखी दोन साथीदारांची नावे व दुचाकींची माहिती दिली. त्यानुसार चेतन संग्रामे याला शिरपुर येथून तर सागर याला बीडकीन या गावावरुन ताब्यात घेण्यात आले. चेतन हा शिरपुर येथील आर.सी.पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. दरम्यान, या तिघांनी जामनेर, औरंगाबाद व शिरपुर येथून दुचाकी चोरल्या आहेत.
चोरीच्या चार दुचाकीसह तिघांच्या मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 8:47 PM
दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात सराईत असलेला राकेश समाधान लोणारी (रा.जामनेर), चेतन ईश्वर संग्रामे (रा.जामनेर, ह.मु.शिरपुर) व सागर शिवराम शिरसाठ (रा.बीडकीन, ता.पैठण, जि.औरंगाबाद) या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्देएलसीबीची कारवाई एक संशयित शिरपुरचा विद्यार्थी