जळगाव : वॉटरग्रेस कंपनीशी विरोधकांचे लागेबांधे असल्याचा आरोप भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र, आरोप करण्याआधी भाजपच्या ज्या तीन नगरसेवकांनी वॉटरग्रेस कंपनीकडून पैसे घेतले. त्या नगरसेवकांचे नावे आधी जाहीर करावीत, असे आव्हान शिवसेना नगरसेवकांनी भाजपचे गटनेते भगत बालाणी यांना दिले आहे.बालाणी यांच्या मध्यस्थीनंतर त्या तीन नगरसेवकांनी वॉटरग्रेस कंपनीकडून घेतलेले पैसे परत केल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला आहे. रविवारी दुपारी १ वाजता शिवसेना कार्यालयात सेना नगरसेवकांची पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, गटनेते अनंत जोशी, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक नितीन बरडे आदी उपस्थित होते. सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचे गटनेते भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह आमदार सुरेश भोळे यांच्यावर घणाघाती आरोप केले.बालाणींनी १५ मिनीटे बोलून दाखवावे...बालाणी यांना शिवसेना नगरसेवक किंवा नेत्यांवर बोलण्याचा कोणताही अधिकार नसून, स्वत: घरकुल प्रकरणात आरोपी ठरल्याने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे. तसेच इतरांवर आरोप करण्यापेक्षा बालाणी यांनी आपल्या आयुष्यात शहरवासियांसाठी केलेली एक उपलब्धी दाखवून, महासभेत शहराचा एका प्रश्नावर केवळ १५ मिनिटे बोलून दाखवण्याचे आव्हान शिवसेना गटनेते अनंत जोशी व शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे यांनी दिले.बालाणींसह इतरांचे ३० वर्षांचे आॅडीट आमच्या हातीनगररचना विभाग बाटवल्याचा आरोप करणाºयांची केंद्रात सत्ता आहे. त्यामुळे कैलास सोनवणे यांनी केंद्राच्या सत्तेचा वापर करून, संबधितांची चौकशी लावून, ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ करावे असा सल्ला सुनील महाजन यांनी भाजप नगरसेवक कैलास सोनवणे यांना दिला. तसेच शिवसेनेच्या एकाही नगसेवकावर भ्रष्टÑाचाराचा आरोप सिध्द करून दाखवावा, आरोप सिध्द झाल्यानंतर सेनेचा नगरसेवक तत्काळ राजीनामा देईल अशीही ग्वाही महाजन यांनी दिली, ३० वर्षात कोणी काय केले हे सर्वांना माहिती असून, नगररचना विभागातील आवक-जावक रजिस्टर कोणती जमा केले हे देखील जगजाहीर आहे. बालाणी यांनीही मेहरूणच्या महाजनांच्या नादी लागू नये अन्यथा ‘मेहरूण मधील दुकान ते लॉन’ असा प्रवास उघडा करू असा इशाराही महाजन यांनी दिला.सुरेशदादांचा फोटो चालला नाही ...घरकुलप्रकरणामुळे महापालिकेच्या सभागृहातील माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा फोटो सभागृहातून काढण्यात आला. मात्र, त्या सभागृहात घरकुल प्रकरणात दोषी असलेले पाच नगरसेवक येवून बसतात. यावर सत्ताधारी बोलायला तयार नाही. बालाणी यांना सभागृहात येण्याची कोणतीही नैतिकता नसून, थोडीशीही नैतिकता त्यांच्याकडे शिल्लक असेल तर त्यांनी आपला पदासोबतच नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा असे आव्हानही अनंत जोशी यांनी दिले. एकनाथराव खडसे यांच्यावर काही आरोप झाल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा दिला. मात्र, भाजपच्या दोषी नगरसेवकांनी राजीनामा दिला नाही. भगत बालानी यांनी शिवसेनेच्या नादी न लागण्याचा सल्लाही जोशी यांनी दिला.पत्रकार परिषदेतीलप्रमुख मुद्दे-प्रशासन ऐकत नसेल तर सत्ता सोडावी-वॉटरग्रेसचा ठेका रद्द करण्याची मागणी आमदारांनी केली ती योग्य, विरोधकांनी केली तर लागेबांधे-बालानी यांचे ३० वर्षांचे आॅडीट आमच्याकडे-अधिकारी ऐकत नसतील आमदारांनी राजीनामा द्यावा
‘वॉटरग्रेस’कडून भाजपच्या तीन नगरसेवकांनी घेतले पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 1:06 PM