एरंडोल (जि. जळगाव) : अंजनी धरणाच्या जलाशयात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा सोमवारी सायंकाळी बुडून मृत्यू झाला. रोहित राहुल ठाकूर (१५), यश उर्फ सिद्धेश राहुल ठाकूर (१६) व आकाश सुभाष चौधरी (१६) अशी मृतांची नावे आहेत. यापैकी रोहित आणि यश हे जुळे भाऊ आहेत.सोमवारी दुपारी एका दुचाकीवरून चौघे मित्र अंजनी धरणावर पोहण्यासाठी गेले होते. या वेळी श्याम संजय महाजन हा वगळता अन्य तिघे पाण्यात उतरले. त्यातील एकाचे पाय गाळात फसल्याने दोघांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तिघेही गाळात फसले व त्यांचा जागीच बुडून मृत्यू झाला. तब्बल सव्वा तासाच्या अथक परिश्रमानंतर ग्रामस्थांना मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. (प्रतिनिधी)पुण्यातील युवकाचा मृतदेह सापडलापुणे : मित्रांसमवेत खडकवासला चौपाटी येथे पोहायला गेलेला मोबीन पठाण (२२, रा. धायरी) युवक सोमवारी बुडाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढला.
धरणात बुडून तीन मुलांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2017 3:33 AM