चाळीसगाव, जि.जळगाव : राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त उमंग व्याख्यानमाला १२ जानेवारीपासून सुरू होत आहे.आमदार उन्मेष पाटील व उमंग समाजशिल्पी महिला परिवारातर्फे आयोजित व्याख्यानमालेचे हे आठवे वर्ष आहे. रात्री आठ वाजता भडगावरोडस्थित अंधशाळा पटांगणावर व्याख्यानमालेची पुष्पे गुंफली जाणार आहेत.१२ रोजी खगोल अभ्यासक हेमंत धानोरकर हे ‘खगोल विश्वातील अद्भुत रहस्ये’ या विषयावर पहिले पुष्प गुंफतील.१३ रोजी अभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड यांचे ‘प्रेम पाकातल्या पाच पुऱ्या...किस्सेशाही’ यावर व्याख्यान होईल.१४ रोजी आहारतज्ज्ञ डॉ.जगन्नाथ दीक्षित यांच्या ‘चला, आरोग्यावर बोलू काही...’ या व्याख्यानाने समारोप होईल. उपस्थितीचे आवाहन उमंग महिला परिवार, उन्मेष पाटील मित्र मंडळाने केले आहे.
चाळीसगाव येथे तीन दिवसीय उमंग व्याख्यानमाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 4:28 PM
चाळीसगाव, जि.जळगाव : राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त उमंग व्याख्यानमाला १२ जानेवारीपासून सुरू होत आहे.
ठळक मुद्देतीन दिवस चाळीसगावकरांना मिळणार व्याख्यानांची मेजवानीविविध क्षेत्रातील मान्यवर गुंफणार विचारपुष्पे१२ जानेवारीपासून सुरू झालेल्या व्याख्यानमालेचा १४ रोजी होणार समारोप