फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील धनाजी नाना महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे तीन दिवसीय चौथे मैत्र संमेलन उत्साहात पार पडले झाले. यात मित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी दीपप्रज्वालन, सरस्वती पूजन आणि माजी मंत्री बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन पुष्पहार अर्पण करून संमेलनाची सुरुवात झाली.व्यासपीठावर अजित पाटील आणि प्राचार्य पी.आर चौधरी तसेच ग्रुपचे सर्व अॅडमिन हर्षद मेहता, प्रकाश पाटील, जीवन चौधरी व आर.वाय.चौधरी उपस्थित होते.उपस्थित सर्व मित्र मैत्रिणींनी आपला परिचय करुन दिला. दोन-तीन वर्षांच्या मैत्रसमूहांच्या छायाचित्रांचे भरविलेले प्रदर्शन पाहून परिसरात फेरफटका मारला व गत स्मृतींना उजाळा देण्यात आला. त्यानंतर हिंदी, मराठी गाण्यांच्या भेंड्या रंगल्या व जुन्या आठवणींचे मोहोळ सर्वांच्याच मनात उठले. त्यानंतर सभागृहात सारे पुन्हा एकत्र आले.सर्व मित्र व मैत्रिणींनी विविध कलाविष्कार सादर केले. त्यात गाणी, कविता आणि अनुभवकथन झाले. तत्पूर्वी दुपारच्या सत्रात प्रा.वैशाली चौधरी व विजय भिरुड यांनी हौजी गेममध्ये सर्वांना सहभागी करून घेत बालपणाच्या जगात फिरवून आणले.दुसऱ्या दिवशी सुकी नदीवरील गारबर्डी येथे धरणावर सहलीसाठी सारे मित्रमैत्रिणी रवाना झाले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा.मंजू नाईक -बोरकर व प्रा.आनंदा चौधरी यांनी केले.माजी विद्यार्थी आणि याच महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक वाय.एम.पाटील यांनी सुरेल आवाजातील भावगीत आणि गझल गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.तिसºया दिवशी समारोप झाला. सूत्रसंचालन हेमंत पोतदार यांनी केले. प्रास्ताविक व स्वागत प्रा.लक्ष्मी पोलडिया-गोसर, वसई यांनी केले. संमेलन यशस्वितेसाठी आर.वाय.चौधरी, जीवन चौधरी, प्रकाश पाटील, एल.ओ.चौधरी, अनिल महाजन, लक्ष्मी पोलडिया, हर्षद गुजराथी, अलका भानगावकर, गुणवंत टोंगळे, प्रभाकर चौधरी आदींनी परिश्रम घेतले.
फैजपूर येथे धनाजी नाना महाविद्यालयात तीन दिवसीय मैत्र संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 4:03 PM
फैजपूर , ता.यावल, जि.जळगाव : येथील धनाजी नाना महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे तीन दिवसीय चौथे मैत्र संमेलन उत्साहात पार पडले ...
ठळक मुद्देमित्र-मैत्रिणींनी दिला शालेय जीवनातील आठवणींना उजाळासर्व मित्र व मैत्रिणींनी विविध कलाविष्कार केले सादर