शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI Repo Rate : ईएमआय कमी होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, यावेळीही रेपो दर 'जैसे थे'
2
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
3
Tejashwi Yadav : "भाजपा आरजेडीला घाबरते, आमचं चारित्र्य खराब करायचंय; ते सत्तेत येऊ शकत नाहीत म्हणून..."
4
Haryana Assembly Election Result 2024 : राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती
5
'भाऊ' Bigg Boss च्या पुढच्या पर्वात दिसणार का? रितेश देशमुख म्हणाला, 'हा निर्णय तर...'
6
धक्कादायक! हिंदू नाव वापरुन २२ पाकिस्तानी राहायचे, बनावट कागदपत्रे बनवून देणाराही अटकेत
7
दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा महिलेवर हल्ला; घरापासून १०० फूट ओढत नेलं अन्...
8
PhysicsWallahचा IPO येणार! कंपनीनं सुरू केलं काम; ४ इन्व्हेस्टमेंट बँकर्सचीही केली नियुक्ती
9
"हा देखावा कशासाठी?"; सामूहिक अत्याचाराच्या जागेची पाहणी करणाऱ्या सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र
10
बहुमत असले तरी अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स भाजपसोबत जाणार? जम्मू काश्मीरमध्ये लावले जातायत अंदाज
11
ऑस्ट्रेलियानं लावली न्यूझीलंडची वाट; आता सेमीसाठी टीम इंडिया कशी ठरेल पात्र?
12
मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू
13
कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा
14
Savitri Jindal Haryana Election Networth : हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे
15
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
16
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
17
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
18
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
19
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
20
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल

धरणगाव येथे साखरझोपेत असलेल्या मायलेकांसह तिघांना ट्रकने चिरडले, मातेचा मृत्यू, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:12 PM

पहाटेच काळाचा घाला

ठळक मुद्देजखमींवर जळगावला उपचारगतिरोधक बसविण्याची मागणी

आॅनलाइन लोकमतधरणगाव, जि. जळगाव, दि. २७ - धरणगाव शहरातील चोपडा रोडवर रस्त्यालगत असलेल्या घरात जळगावहून चोपड्याकडे जाणारा भरधाव ट्रक घुसून घराबाहेर झोपलेल्या दोन महिला व १४ वर्षीय मुलाला चिरडल्याची घटना शुक्रवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. त्यातील रेखाबाई संजय भिल (वय-३५) ही महिला जागीच ठार झाली तर आनंद संजय भिल (वय-१४), जयत्राबाई भिल(वय-६५) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.चोपडा रोड लगत असलेल्या घराबाहेर रेखाबाई भिल, तिचा १४ वर्षीय मुलगा आनंद व जयत्राबाई हे खाटेवर झोपलेले होते. साखर झोपेत असताना जळगावहून चोपड्याकडे जाणारा भरधाव ट्रकने (क्र.एम.एच.१८, ०५७३) तिघं जणांना चिरडून ट्रक घरात घुसला. या घटनेची वार्ता कळताच नागरिकांनी धाव घेतली व मदत कार्य केले. यावेळी गुलाबराव वाघ, भानुदास विसावे, धिरेंद्र पुरभे,गुलाब मराठे आदींनी सहकार्य केले.गतिरोधक न बसविल्यास आंदोलनचोपडा रोडवर वाहनांची वर्दळ असते. रस्त्याच्या एका बाजूला पारधी वाडा तर दूसऱ्या बाजूला भिलवाडा व तीन वार्डाच्या महिलांसाठी सार्वजनिक शौचालय असल्याने वर्दळ असते. मात्र या परिसरात गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव वेगाने जातात. त्यामुळे या परिसरात गतिरोधकाची आवश्यकत असल्याने सा.बां.विभागाने गतिरोधक बसवावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा ईशारा नगरसेविका संगिता गुलाब मराठे यांनी दिला आहे.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव