शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

पष्टाणे उपसरपंच निवडीवरून धरणगाव तहसील कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 11:12 PM

सुदर्शना पाटील यांची निवड रद्द करण्याची मागणी

धरणगाव : तालुक्यातील पष्टाणे बु.येथे झालेल्या उपसरपंच निवडी प्रसंगी निवडणूक अधिकाऱ्यांनी कुठलेही नियम न समजाविता सदस्यांची दिशाभूल करुन दोन वेळा सरपंचांना मतदानाचा अधिकार देवून एका गटाचा उपसरपंच चुकीच्या पध्दतीने निवड केल्याचा आरोप करुन दूसºया गटाच्या सदस्यांसह ५० ग्रामस्थांनी संध्याकाळी ६ ते रात्री ९ वाजे पर्यत तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. तहसिलदार सी.आर.राजपूत यांना निवेदन देवून ही निवडणूक रद्द करण्याची मागणी केली.पष्टाणे ता.धरणगाव येथे ३ रोजी उपसरपंच निवड प्रक्रीया झाली. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सत्यपाल डी.पाटील हे होते. निर्णय अधिकाºयांंना सदस्य निलेश पाटील यांनी निवडणूकीचे नियम समजावून सांगण्याची मागणी केली असता त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. यावेळी सुदर्शना संजय पाटील विरुध्द सुनिल भाऊलाल पाटील यांनी उमेदवारी दाखल केली होती. यावेळी सदस्यांसोबत विद्यमान सरपंच प्रकाश सोनवणे यांनी मतदान केल्याने दोघां उमेदवारांना समसमान ४/४ मते मिळाले. त्यामुळे पुन्हा दुसºयांदा सरपंच सोनवणे यांनी निर्णायक मतदान सुदर्शना पाटील यांच्या बाजूने केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सुदर्शना पाटील यांना विजयी घोषीत केले. मात्र ही निवड चूकीची असून असल्याचा आरोप पराभूत उमेदवार सुनिल पाटील, नीलेश पाटील, दिपाली पाटील, सुनिता पाटील या सदस्यांसह ग्रामस्थांनी केला आहे. ही निवडणूक रद्द करावी या मागणीसाठी त्यांनी तीन तास तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. 

टॅग्स :Jalgaonजळगाव