ऑनलाईन लोकमतएरंडोल,दि.4 - नागदुली येथील अनिल मोरे यांच्या खूनप्रकरणाच्या तपासात होत असलेली दिरंगाई आणि मारेक:यांविरूद्ध अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी एकलव्य संघनेतर्फेतर्फे सोमवारी दुपारी 3 वाजता एरंडोल पोलीस स्टेशनवर इशारा मोर्चा काढण्यात आला. तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.मोर्चाचे नेतृत्त्व प्रदेशाध्यक्ष शिवाजी ढोबळे, जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ, धर्मभूषण बागुल, तालुकाध्यक्ष सुक्राम ठाकरे, ऋषी सोनवणे यांनी केले. दुपारी 1.30 वाजता एरंडोल ग्रामीण रुग्णालयापासून मोर्चा निघाला. दुपारी तीन वाजेच्या सुमारास मोर्चा एरंडोल पोलीस स्टेशनजवळ आला. पो.स्टे. समोरील राज्य महामार्गावर मोर्चेक:यांनी जवळपास तीन तास ठिय्या आंदोलन केले. चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी या प्रकरणाचा तपास चोपडा विभागाचे डीवाय.एस.पी. यांचेकडे देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, तहसीलदार सुनीता ज:हाड यांनीही मोर्चेक:यांशी चर्चा केली. या मोर्चात तुळशीराम पवार, मुकुंद सपकाळे, संजय सोनवणे, योगेश अहिरे, राज चव्हाण, अशोक पाटील (नागदुली माजी सरपंच) जयेश माळी यांच्यासह जवळपास 400 ते 500 कार्यकर्ते सहभागी झाले.
एरंडोल येथे पोलीस स्टेशनसमोर तीन तास ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 10:31 PM
एकलव्य संघटनेतर्फे अनिल मोरे यांच्या खून प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी काढला मोर्चा
ठळक मुद्देनागदुली येथील अनिल मोरे यांच्या खूनप्रकरणी मारेक:यांवर अॅट्रॉसिटी दाखल न करणा:या तपास अधिका:यांवर कर्तव्यात कसूर केल्याबाबत त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करा.खूनाचा तपास वरिष्ठ अधिका:यांकडे सोपवून मारेक:यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी.मयत मोरे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी.